शासनाला निवेदन देऊनही न्याय मिळत नसल्याने २४ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त पुणे यांचे कार्यालयासमोर करणार आत्मदहन.....    


पंढरपूर,(दिनेश खंडेलवाल),२१/१२/२०२० - गेल्या तेवीस वर्षांपासून शासकीय सेवेमध्ये हजेरी सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले राजेंद्र संदिपान बनकर यांनी शासनाला विनंती करूनही शासकीय सेवेत रोहयो यांचेकडील शासन निर्णया प्रमाणे शासकीय समावेशन न केलेने व मासिक वेतन वेळेवर अदा न केल्याने आत्मदहना शिवाय पर्याय राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आजपर्यंत अनेक वेळा त्यांनी शासनाकडे निवेदने दिली विनंती अर्ज केले परंतु त्याचा काहीही परिणाम होत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होऊन मानसिक स्थिती व घरातील कौटुंबिक परिस्थिती याचे संतुलन बिघडले आहे . या सर्वांचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून आपली जगण्याची इच्छा राहिलेले नाही या निर्णयावर ते आले आहेत.

     त्यांचा सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेल्या ग्रँडचा वापर इतर कामकाजासाठी केला गेला असल्याचे सांगत असून यामुळे कोणताही सण उत्सव त्यांना साजरा करता आला नाही. अखेर २४ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त पुणे यांचे कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे .

पंढरपूरचे हजेरी सहायक राजेंद्र बनकर शासकीय समावेशनाच्या प्रतीक्षेत 
pandharpurs attendance assistant rajendra bankar awaits government inclusion
 
Top