अज्ञात धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारले

  पंढरपूर,१०/१२/२०२०- दि.२१/१०/२०२० रोजी लक्ष्मीनगर, गजानन महाराज मठजवळ,पंढरपूर येथे प्रभावती मधुकर कदम हिच्यावर तिचा सावत्र मुलगा संजय उर्फ भोल्या मधुकर कदम, राहणार कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर याने अज्ञात धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारले आहे असे मयताची मुलगी सौ मयुरी ज्ञानेश्वर जाधव,वय १८ वर्षे ,धंदा घरकाम, जात मराठा,मूळ राहणार पळशी,जिल्हा औरंगाबाद, सध्या राहणार हरंगुळ रेल्वे स्टेशन जवळ लातूर,माहेर लक्ष्मीनगर, गजानन महाराज मठ, पंढरपूर हिने दिलेल्या फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७०६/२०२० कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी संजय ऊर्फ भोल्या या मधुकर कदम हा गुन्हा घडल्यापासून अद्यापपर्यंत फरार होता.सदर गुन्ह्याचे तपासकामी फरार आरोपींचा शोध घेणेसाठी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व कर्मचारी हे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम व शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शना खाली सदर आरोपीचा शोध घेत होते. या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपीचे राहते गावी तसेच त्याचा भाऊ राजू मधुकर कदम व त्याचे इतर पाहुणे यांच्याकडे तपास केला परंतु सदर आरोपी मिळून आला नाही. सदर आरोपी हा वापरत असलेल्या मोबाईलचे तांत्रिक तपास करून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आला, परंतु सदर आरोपी हा मिळून आला नाही. त्याचे मागावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार अद्यापपर्यंत होते.

    सदर आरोपीने त्याचे ओळखीच्या अनोळखी इसमाकडून फोन घेऊन त्याचे फोनवरून वारंवार संपर्क साधण्याची माहिती मिळाली होती परंतु सदर आरोपी हा अनोळखी व्यक्तीच्या वेगवेगळ्या मोबाईलवरून संपर्क साधत असल्याने तो कोठे आहे याबाबत माहिती मिळू शकत नव्हती. परंतु दिनांक २८ नोव्हेंबर २०२० रोजी सदर आरोपीने अनोळखी इसमाचे मोबाईलवरून त्याच्या ओळखीच्या इसमाच्या मोबाईल वरून संपर्क साधत असल्याने तांत्रिक दृष्ट्या माहिती मिळवून सदर बाबीचा तपास करून आरोपींचा ठावठिकाणा बाबत अथक परिश्रम करून माहिती काढून त्यास ताब्यात घेऊन पंढरपूर पोलीस ठाण्यात आणून तपासी अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले.सदर आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

ही कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई राजेंद्र गाडेकर, पोहेकॉ सुरज हेंबाडे,पो.ना. गणेश पवार,पो.ना.इरफान शेख,पो.ना.शोएब पठाण,पो.ना.प्रसाद औटी,पो.कॉ.सिद्धनाथ मोरे,पो.कॉ. संजय गुटाळ,पो.कॉ.जाधव, पो.कॉ. समाधान माने व अन्वर आतार,सायबर पोलीस ठाणे यांनी केला असून त्याबाबत पुढील तपास दशरथ वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

पंढरपूर शहर पोलिसांनी खून करून फरार झालेल्या आरोपीस केले जेरबंद Pandharpur city police arrested a fugitive accused of murder  
 
Top