श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा 2020

कार्तिकी वद्य त्रयोदशीला श्री.संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री.पांडूरंगाच्या पादुका पालखीतुन आळंदी येथे घेवून जाण्याचा व परत आणण्याचा उपक्रम श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्यावतीने सन २०१४ पासून सुरु करण्यात आलेला आहे.        यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, श्री.पांडूरंगाचा पालखी सोहळा श्री.संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी प्रतिकात्मक व मर्यादित स्वरूपात जावून परत येणार आहे. त्याबाबत मा. राज्य शासनाची मान्यता घेण्यात आली आहे. सदरचा पालखी सोहळा दि.११ ते १३/१२/२०२० या कालावधीत जावून परत येणार आहे. त्यानुसार सदरचा पालखी सोहळा आज एस.टी.ने दि.११/१२/२०२० (स.८.००) रोजी पंढरपूर येथून आळंदीकडे प्रस्थान झाला आहे. 

       यावेळी मंदिर समितीचे मा.सदस्य ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जळगांवकर), ह.भ.प.श्री. प्रकाश महाराज जवंजाळ तसेच व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख श्री.बलभिम पावले व मंदिर समितीचे कर्मचारी तसेच वारकरी भाविक उपस्थित होते.
 
Top