शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे 'केबीपी'मध्ये आयोजन

पंढरपूर,१०/१२/२०२० -रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री डॉ.शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये आविष्कार समितीच्यावतीने भित्तीपत्रक प्रकाशित, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने वृक्षा रोपन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच राज्यशास्त्र विभागाच्या वतीने 'माननीय शरदश्चंद्रजी पवार यांचे सामाजिक व राजकीय विचार' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबसेमीनारचे आयोजन करण्यात आले आहे. 

     सातारा येथील ईस्माइल मुल्ला विधी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ. अजितानंद पाटील हे साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ.रवींद्र भणगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर चर्चासत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होणार आहे. हे राष्ट्रीय वेबीनार रुसा काम्पोनंट ८ अंतर्गत घेण्यात येणार आहे. 

    या चर्चासत्रात सर्व सहभागींना मुफ्त प्रवेश दिला जाणार असून नावनोंदणी करुन सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे,अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांनी दिली आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे 'केबीपी'मध्ये आयोजन Organizing various programs on the occasion of Sharad Pawars birthday in KBP
 
Top