पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात हिंदू जनजागृती समितीच्या प्रतिनिधींकडून निवेदन स्वीकारताना पोलिस निरीक्षक सुरेश कदम आणि पोलिस उपनिरीक्षक सुधीर कटारे

नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीद्वारा मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पोलिस-प्रशासनाला निवेदने

      मुंबई ,दि.२७/१२/२०२० - नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान,मद्यपान,अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होत आहेत. गंभीर बाब म्हणजे या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणार्‍या युवापिढीचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, बीभत्स गाण्यांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करून नाचणे,शिवीगाळ करणे,मुलींची छेडछाड-विनयभंग-बलात्कार आदी कुकृृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येतो. यासाठी ३१ डिसेंबरच्या दिवशी मुंबई, मुंबई उपनगरासह राज्यातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा तसेच या ठिकाणी पोलिस दलाचे नियोजन करण्याची मागणी करणारी निवेदने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई पोलिस आयुक्त आणि मुंबई जिल्हाधिकारी यांना इ-मेल द्वारे पाठविण्यात आली. याप्रमाणेच पालघर जिल्हाधिकारी तसेच पालघर, अंबरनाथ आणि बोरिवली येथील तहसीलदार कार्यालये आणि पालघर, बोईसर, नालासोपारा,मालाड,बोरिवली,धारावी,चुनाभट्टी, बदलापूर,कापूरबावडी (ठाणे) येथील पोलिस स्थानकांत या आशयाची निवेदने देण्यात आली.

मालाड येथील पोलिस ठाण्यात निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे प्रतिनिधी

यंदाच्या वर्षी कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. अनेक तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहे. अशा वेळी ३१ डिसेंबरला पार्ट्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी किंवा ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणार्‍या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) बंदी घालावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

नववर्ष ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे,तर गुढीपाडव्याला साजरे करण्याचे आवाहन

हिंदू बांधवांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे; हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे,असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्यावतीने करण्यात आले.

३१ डिसेंबरच्या रात्री कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे 
on night of december 31,serious situation is being created in terms of law order
 
Top