बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न 

पंढरपूर, १५/१२/२०२०-दिनांक ०३/१२/२०२० पासून आज दिनांक १५/१२/२०२० पर्यंत सोलापूर वन विभागाने बिबट्या वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करत थर्मल ड्रोन, डॉग स्कॉड सर्चकिंग, डेली पगमार्क डेटा ऍ़नालेसीस व ऑन स्पॉट कॉल व्हेरिफिकेशन असे चौदा गस्ती पथकाच्या माध्यमातुन केले जात आहे. याचबरोबर कॅमरा ट्रॅप,पिंजरे, बेशुध्दी पथक-2 शार्प शुटर टिम,एसआरपीएफ, पोलिस पथक यांना पाचारण करण्यात आलेले आहे.

           वनकर्मचारी करत आहेत जनजागृती

      लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व वन कर्मचारी अहोरात्र घरोघरी पोहचून लोकांच्यामध्ये बिबट्या प्राण्याविषयी जनजागृती करत आहेत. मागील एक आठवडा नरभक्षक बिबट्याविषयी लोकांमध्ये गैरसमज व अफवा यांचे निराकरण  करण्याचे प्रयत्न वनविभाग करत आहे.बऱ्याच ठिकाणी बिबट्याचे ठसे म्हणून तरस, कुत्रे व इतर वन्यप्राण्यांचे ठसे अथवा चित्रफिती या प्रसार माध्यमामध्ये येत आहेत. तरी लोंकानी इंटरनेटच्या मध्यमातून बिबट्याचे ठसे व त्याची माहिती घेत जुन्या व खोट्या चित्रफिती यांची शहानिशा करावी व नंतरच विश्वास ठेवावा.दि १४/१२/२०२० रोजी मौजे भिवरवाडी ता. करमाळा येथील गायीवर झालेला हा हल्ला तरस या वन्य प्राण्यांने केला असून ते तेथे मिळालेल्या केसाच्या सँपल व पायाच्या ठस्यावरुन सिध्द होते.तरी सर्व लोकांनी अफवावरती विश्वास ठेऊ नये.कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा ते कारवाईस पात्र ठरतात असे आवाहन वनविभाग सोलापूर यांनी केले आहे. 
 
Top