केंद्र सरकारने केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी जाचक

पिंपरी चिंचवड,०७/१२/२०२० - आठ तारखेच्या देशव्यापी भारत बंदला महाराष्ट्रमधून भारतीय राष्ट्रवादी पार्टीतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक कृषी कायदे रद्द करण्यासाठी मंगळवारी आठ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला महाराष्ट्र मधून पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.केंद्र सरकारने केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी जाचक ठरू लागले आहेत. शेतकऱ्यांना मारक आणि भांडवलदारांच्या हिताचे कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी देशभरा तील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत तरी भांडवलदारांचे हित जोपासणार्या केंद्र सरकारला जाग येत नसल्याने आठ डिसेंबर मंगळवार रोजी कृषी कायदे रद्द करण्यासाठी विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी देशव्यापी बंद पुकारला आहे.


    या बंदला आपला पूर्ण पाठिंबा असून भारतीय राष्ट्रवादी पार्टी व महाराष्ट्रमधील सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील या बंदमध्ये सहभागी होऊन देशव्यापी बंद होण्यासाठी सहकार्य करणार आहेत असे पत्र अजित संचेती, जनसंपर्क प्रमुख भारतीय राष्ट्रवादी पार्टी महाराष्ट्र यांनी काढलेले आहे.
 
Top