उस्मानाबाद,(जिमाका) - अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनूसार दि.२४ डिसेंबर २०२० हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” जिल्हाधिकारी कार्यालयात वेबिनारव्दारे साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमामध्ये मुकूंद भगवान सस्ते यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या नवीन स्वरूपा बाबत मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शनात नवीन कायद्याबाबत सविस्तर माहिती देण्याबरोबरच इतरही विषयांची माहिती दिली.
वैधमापन विभागाचे निरीक्षक श्री.मिसाळ यांनी वजने व मापे कायद्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन कायद्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सर्व शासकीय व अशासकीय सदस्य झूम मिटिंगद्वारे उपस्थित होते.या वेबिनार कार्यक्रमाची प्रस्ताविक भाषणात जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारुशीला देशमुख यांनी ग्राहक दिनाचे महत्व सांगितले. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मनिषा मेने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राष्ट्रीय ग्राहक दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा national consumer day celebrated at the collectors office