मराठा समाज बांधवांच्या समस्या ऐकण्यासाठी नरेंद्र पाटील गुरुवारी पंढरपूरात

 पंढरपूर, ०८/१२/२०२०- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील यांना अखिल भारतीय मराठा महासंघाने 'मराठा आरक्षणाची सद्यस्थिती' आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील 'लाभार्थ्यांच्या समस्या" समजावून घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी पंढरपूर येथे आमंत्रित केले आहे. यावेळी सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाज संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

    या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केले आहे.गुरुवार दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता पंढरपूर येथील शेठ मोरारजी कानजी सभागृह, स्टेशनरोड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 
Top