भविष्यकालीन आव्हाने लक्षात घेऊन नवनवीन संधी शोधल्या पाहिजेत

पंढरपूर,१९/१२/२०२०- नँक ही सोपी व सुलभ प्रक्रिया असून ती महाविद्यालयाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. महाविद्यालय विद्यार्थी व समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करीत असते. त्‍या सर्व उपक्रमांचा समावेश यात केला जातो. महाविद्यालयाने स्वतःची बलस्थाने लक्षात घेऊन आपल्या उणिवाही शोधल्या पाहिजेत.प्राप्त परिस्थितीत शिक्षणाच्या प्रक्रियेमधील भविष्यकालीन आव्हाने लक्षात घेऊन नवनवीन संधी शोधल्या पाहिजेत. नँकने दिलेल्या या दर्जाचा महाविद्यालयाच्या विकासासाठी निश्चितच फायदा होतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.कुंडलीत शिंदे यांनी केले.

    रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परामर्श योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

महाविद्यालयाचे संकेतस्थळ हे त्याचा आरसा

        प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे पुढे म्हणाले की, महाविद्यालयाचे संकेतस्थळ हे त्याचा आरसा असतो. महाविद्यालयाने आपले संकेतस्थळ अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. महाविद्यालय सातत्यपूर्ण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. ग्रामीण भागा तील महाविद्यालयांनी आपल्या गरजा लक्षात घेऊन नियोजन केले तर याचा नँकसाठी निश्चितच फायदा होतो.

      कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात नँक समन्वयक डॉ.अमर कांबळे यांनी नँकसाठी आवश्यक अशा डॉक्युमेंटेशनची माहिती दिली. सध्या ऑनलाईन पद्धतीने ७० टक्के मूल्यांकन होत असून उर्वरित ३० टक्के मूल्यांकनासाठी समिती महाविद्यालयास भेट देत असते.या सर्व प्रक्रियेमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी,माजी विद्यार्थी,प्रकाशित झालेल्या बातम्या व फोटो,उपस्थिती पत्र व सहभागी विद्यार्थ्यांची यादी या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात.

           कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात सहभागी प्रतिनिधींना मूल्यांकनासाठी तयार करण्यात आलेली प्रत्यक्ष कागदपत्रे दाखवण्यात आली.डॉ.समाधान माने,डॉ.मधुकर जडेल, प्रा.धनंजय वाघदरे,डॉ.चंद्रकांत काळे, डॉ.विनया पाटील, डॉ. श्रीकृष्ण कराळे व प्रा.घनश्याम भगत यांनी यामध्ये सहभाग घेतला. कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव प्रा. रघुनाथ झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

       या कार्यशाळेत मदनसिंह मोहिते पाटील महाविद्यालय मंगळवेढा, न्यू सातारा कॉलेज ऑफ बीसीए,कोर्टी व माणदेश महाविद्यालय, जुनोनी येथील प्राध्यापकांनी सहभाग घेतला.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी गणेश वायाळ,अभिजीत जाधव व गणेश फुलारे आदींनी परिश्रम घेतले.

नँक ही सोपी सुलभ प्रक्रिया असून महाविद्यालयाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त Nak is simple,easy process and very useful for college development 
 
Top