माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडून
कुर्डुवाडी,(राहुल धोका),०९/१२/२०२०- कुर्डुवाडी नगरपरिषद माझी वसुंधरा अंतर्गत दि.०९/१२/ २०२० रोजी सायकल रॅली (फेरी) करण्यात आली महाराष्ट्र राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थां मध्ये दि.०२ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२० या सहा महिन्याच्या काळात माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडून राबविण्यात येत आहे.

सदर अभियानात निसर्गाच्या संबंधित पृथ्वी,वायू, जल,अग्नी, आकाश या पंचमहाभूतांचे पंचतत्वाचे संवर्धन करणेकरीता तसेच निसर्गपूर्वक जीवन पद्धती अवलंब करून पर्यावरणाचे व निसर्गाचे संतुलन राखले जावे यासाठी आपण सर्व नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या अभियानाअंतर्गत कुर्डुवाडी नगरपरिषद विविध उपक्रम राबवित आहे. यामध्ये दि.०९/१२/२०२० रोजी कुर्डुवाडी नगरपरिषद अंतर्गत सायकल रॅली फेरी घेण्यात आली.

कुर्डूवाडी नगरपरिषदेच्यावतीन माझी वसुंधरा अभियान My Vasundhara Abhiyan on behalf of Kurduwadi Municipal Council
 
Top