पाच लाख ७५ हजार रुपयांचे १९ मोटारसायकली जप्त

   पंढरपूर,१०/१२/२०२०-पंढरपूर शहर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणारा चोर जेरबंद करून पाच लाख ७५ हजार रुपयांचे १९ मोटारसायकली जप्त केल्या पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा र.नं.780/2020 प्रमाणे २९/११/२०२० रोजी दाखल गुन्ह्याचा तपासकामी उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असताना पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की विठ्ठल हनुमंत चौगुले,वय वर्षे ३५,राहणार भोसे,तालुका पंढरपूर,जिल्हा सोलापूर हा मोटरसायकलची चोरी करत आहे.

 मिळालेल्या माहितीची खातरजमा करून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर व त्यांचे पथक यांनी शिताफीने विठ्ठल हनुमंत चौगुले यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असताना त्यांनी सांगितले की सदर मोटरसायकल मी आणि नामदेव बबन चुनाडे, वय ४८ , राहणार अनिलनगर,पंढरपूर यांनी मिळून चोरली आहे  असे निष्पन्न झाले.

   सदर मोटरसायकलीचे वर्णन खालील प्रमाणे असून सदर मोटरसायकली पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे जप्त आहेत. 


      वरीलप्रमाणे मोटरसायकली सदर आरोपीने चोरी केले असल्याचे त्याने सांगितले.त्याचेकडून मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत.सदर मोटरसायकलबाबत कोणकोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत काय याबाबत पुढील तपास चालू आहे.

      सदरची कामगिरीही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम ,पंढरपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटी करण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर,पो.हे.काँ. सुरज हेंबाडे,पो.ना.गणेश पवार पो.ना.इरफान शेख,पो.ना. शोएब पठाण,पो.ना. प्रसाद औटी,पो.कॉ.सिद्धनाथ मोरे, पो.कॉ.संजय गुटाळ,पो.कॉ.जाधव,पो.कॉ.समाधान माने, पो.कॉ.अन्वर आतार सायबर पोलीस ठाणे यांनी केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना.प्रसाद औटी करत आहेत. 
 
Top