नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु

        पंढरपूर, २८/१२/२०२० - फायनान्स आणि अनेक बँकांकडून पैशाचे मोठे घोटाळे झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये अनेक नागरिकांनी पै पै जमा केलेली आयुष्याची पुंजी गुंतवली होती ती बुडाली.वृधदापकाळासाठी मोठ्या आशेने जादा व्याज मिळणार म्हणून ठेवी ठेवल्या होत्या त्या बुडाल्या. या नागरिकांना दिलासा देण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत संत तनपुरे महाराज मठ, पंढरपूर येथे मैत्रेय फायनान्स,मुंबई यांच्याकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा मेळावा घेण्यात आला होता.

मैत्रेय फायनान्स ,मुंबईने केली कोट्यावधी रुपयांची फसवणूक

     मैत्रेय फायनान्स ,मुंबईने गुंतवणूकदारांकडून कोट्यावधी रुपये घेऊन फसवणूक केली आहे,त्या सर्व गुंतवणूकदारांन न्याय मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.


      यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिलिप पाचंगे,शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड,महिला शहराध्यक्ष सौ रंजना इंगोले,प्रताप भोसले,नागेश इंगोले,जवंजाळ मॅडम,गायकवाड आदीसह फसवणूक झालेले गुंतवणूकदार उपस्थित होते.


फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना मनसे देणार आधार 
mns will provide support to fraudulent investors
 
Top