शाळा सुरू झाली असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी म्हणून 

पंढरपूर,१२/१२/२०२०- सिध्देवाडी,तालुका पंढरपूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते मनसे शाखा सिध्देवाडी यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले.तेथील शाळा सुरू झाली असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली पाहिजे याचाच एक भाग म्हणून   मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले.


यावेळी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशी काळजी घ्यायची यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.


      या कार्यक्रमावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष महेश पवार,डी.डी.जाधव सर, दत्तात्रय जाधव सर, दशरथ लवटे सर,पांडुरंग नागटिळक सर,विक्रम तिकुटे,स्वप्निल जाधव, सज्जन मस्के,शहाजी भोपळे,समाधान मस्के,सोमनाथ जाधव,रणजित लांडगे,आदिनाथ कोळीं सह शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक उपस्थित होते.
 
Top