शाळा सुरू करताना घ्यायची काळजी तसेच पालकांच्या आणि संस्था चालकांच्या विविध समस्यांबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची दि.२८ डिसेंबर, २० रोजी वरिष्ठ शिक्षण आणि महापालिका शासकीय अधिकारी यांच्यासमवेत बैठक...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय

पुणे,दि.२७/१२/२०२०- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच शाळा सुरू करत असतानाचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आल्यानंतर महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दि.१० डिसेंबर २०२० रोजी बैठक घेऊन सूचना केल्या होत्या.

आता जानेवारी २०२१ पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय

    आता जानेवारी २०२१ पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिका,नगर पालिका तसेच जिल्हापरिषद यांनी घेतला आहे.या संदर्भात ना.डॉ.गोऱ्हे ह्यांनी उद्या दि.२८ डिसेंबर, २०२० रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील वरिष्ठ शिक्षण अधिकारी, महापालिका प्रशासन, पालक, संस्था चालक यांच्या समवेत बैठक आयोजित केली आहे.

यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची घ्यावयाची दक्षता,फी बाबत चर्चा, पालकांच्या विविध समस्या याबाबत सविस्तर चर्चा आणि याबाबत सहमतीने योग्य त्या संवादातुन आदर्श कार्यपद्धतीबाबत सुचना घेण्यात येणार आहेत.

पालकांच्या,संस्था चालकांच्या समस्यांबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची बैठक meeting of dr.neelam gorhe,deputy speaker of the Legislative Council regarding problems of parents and Institutional driver 
 
Top