धाक दाखवून लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक

      कुर्डुवाडी,(राहुल धोका),३१/१२/२०२० - कुर्डूवाडी येथील सराफा व्यापारी शुभंकर पाठक यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याचा पिस्तुलचा वापर करत धाक दाखवून लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात कुर्डूवाडी पोलिसांना यश आले आहे .

आरोपी किशोर उर्फ आप्पा बाळू ढवळे,वय २४, रा.कुर्डुवाडी यास अटक करण्यात आली असून त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी ही दिली गेली आहे.फरार झालेले सहआरोपी निलेश गायकवाड, मनोज हाडे,अशोक कसबे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला असून त्यांचा तपास चालु आहे.

सदर आरोपींनी सराफ व्यापारी विशाल भारत पुर्वत यांनाही दि १६ नोव्हेंबर २०२० रोजी शस्त्राचा धाक दाखवून लुबाडण्याचा प्रयत्न केला गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .
कुर्डुवाडी पोलिसांनी व्यापार्यांवर झालेल्या हल्याची कसून चौकशी करतानाच व्यापारी वर्गाला वेळोवेळी योग्य सुचना करुन मार्गदर्शन केले त्या मुळे व्यापारी वर्गातील भीतीचे वातावरण निर्माण झाले नाही. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी निष्पन्न झाल्याने नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानत धन्यवाद दिले आहेत.
सराफ व्यापारी घेवरचंद धोका
याबाबतचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे ,पोलिस निरिक्षक रविंद्र डोंगरे यांच्या मागर्दशनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक चिमणाजी केंद्रे, दत्ता सोमवाड ,सागर गवळी,संभाजी शिंदे,अन्वर अत्तार सायबर क्राईम सोलापुर ,पोलिस शिपाई माळी यांनी आरोपींना शोधण्यात यश मिळविले आहे.

कुर्डुवाडी पोलिसांची मोठी कारवाई,सराफाला लुबाडणारा जेरबंद major operation by kurduwadi police,arresting thief
 
Top