काँग्रेस ओबीसी विभाग पंढरपूरच्यावतीने पुणे पदवीधरचे नुतन आमदार अरुण लाड यांचा सत्कार

पंढरपूर,०६/१२/२०२०- महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाङ हे रविवार दि.०६ डिसेंबर रोजी पंढरपूर येथे आले असता त्यांचा सत्कार काँग्रेस ओबीसी विभागाचे पंढरपूर शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला आणि नुतन आमदार अरुण लाड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

      यावेळी ओबीसी काँग्रेसचे शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांनी काँग्रेसच्यावतीने करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली व नुकत्याच पार पडलेल्या पुणे पदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या नियोजनबद्ध कार्याची माहिती दिली.

     सत्काराला उत्तर देताना आमदार अरूण लाड यांनी काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या कामाचे कौतुक करत आगामी काळात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पदवीधराचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

     काँग्रेस ओबीसी विभाग पंढरपूरच्यावतीने पुणे पदवीधरचे नुतन आमदार अरुण लाड यांचा सत्कार Mahavikas Aghadi will try to solve the pending issues of graduates through the government - MLA Arun Lad
 
Top