नगरपालिका कर्मचारी सध्या रात्रीही करताहेत स्वच्छता

    

कुर्डुवाडी,(राहुल धोका) - कुर्डुवाडी शहरात नगर परिषदच्यावतीने माझी वसुंधरा maazi vasundhara अभियान राबवण्यात येत आहे. पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे,उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे मुख्याधिकारी समीर भुमकर यांच्या मार्गदर्शना खाली शहरात हे अभियान राबवले जात आहे.शहरात नगरपालिका कर्मचारी सध्या रात्रीही स्वच्छता करताना दिसत आहेत.

वसुंधरेला स्वच्छ व सुंदर , हरित ठेवण्यासाठी प्रयत्नशिल राहिल

     यावेळी मी भारताचा सुजान नागरिक अशी प्रतिज्ञा करतो की,मी या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर , हरित ठेवण्यासाठी प्रयत्नशिल राहिल, पर्यावरणाला माझ्याकडून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची मी दक्षता घेईन. मी वसुंधरेला सुजलाम ,सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहिल. यासाठी मी वृक्ष,जल,हवा,उर्जा, मृदा,वातावरण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार नाही याची हमी मी या प्रतिज्ञेद्वारे देत आहे.

    अशी प्रतिज्ञा नगरपालिका कर्मचारी नागरिकांना नगर पालिकेकडून देण्यात येत असून दि २ आँक्टोंबर २०२० पासुन ३१ मार्च २०२१ पर्यंत शहरात शपथविधी व विशेष उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती आरोग्य निरिक्षक तुकाराम पायगण यांनी दिली.

कुर्डुवाडी शहरात नगरपरिषदच्यावतीने माझी वसुंधरा अभियान 
maazi vasundhara abhiyan on behalf of the municipal council in kurduwadi
 
Top