आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दिनांक १२ डिसेंबर रोजीच्या वाढदिवसा निमित्ताने एक रचना.......
बारामतीचा हिरा,चौकोनी चिरा
अनुभवाचा झरा,राजकारणी खरा !!१!!
राजकारणात ऋषीतुल्य,कर्तृत्वात अमृततुल्य
त्यांची तीक्ष्ण चतुर मती
जाईल तिथे गती अन प्रगती!!२!!
स्मरणशक्ती तुफान , वाचन तुफान
सर्वत्र त्यांचे गुणगान,सर्वाना त्यांचा अभिमान !!३!!
अर्धशतक सत्तेच्या संसदीय राजकारणात
अष्टपैलू खेळाडू अजूनही रमतात
सत्तेच्या मैदानात !!४!!
शरीर असो,असाध्य रोग असो
निंदा नालस्ती ,आरोप असो
सर्वांवर त्यांची मात
सर्वसामान्यांच्या विकासासाठीच त्यांचे
कार्यरत दोन्ही हात !!५!!
असा नेता आमुच्या गावातला
भूषण गौरव आम्हा इच्छितो
उदंड आयुष्य,उदंड ऊर्जा,उदंड शक्ती
या आमुच्या जाणत्या राजाला !!६!!
ना.शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने:
साहेब बारामतीची शान आहे
जाईल तिथे त्यांना मान आहे
कर्हेच्या काठी गाव आहे
राजकारणात स्वतंत्र नावं आहे
पंतप्रधान पदापर्यन्त धाव आहे
गनिमी कावा हाच राजकीय डाव आहे
संघटन कौशल्य तोड नाही
प्रशासनावर जबर पकड पर्याय नाही
पट्टी पाडणं हातचा मळ आहे
हाती राज्याच्या सत्तेची कळ आहे
सर्वाना पुरून उरणारे बळ आहे
ऐंशी वर्षं होऊन गेली तरीही
झाड अजूनही हिरवेगार आहे "!!
आनंद कोठडीया,जेऊर ९४०४६९२२००