कोरोना पार्श्वभमीवर मोठ्या प्रमाणावर चोरीचे प्रमाण

कुर्डुवाडी,(राहुल धोका),०३/१२/२०२० - कुर्डुवाडी शहरातील व्यापार्यावर आजपर्यंत तिसरा हल्ला झाला असून विठ्ठल मंदिरजवळ सराफ व्यापारी शुभंकर बाळु पाठक ,वय २६ ,त्यांचा कामगार तानाजी सलगर,वय ३६ यांना तीन अज्ञात व्यक्तिंनी डोळ्यात माती व मिर्ची टाकुन हातातील बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याप्रसंगी कोणतीहि जोखिम नसल्याने सदर लुटण्याचा प्रयत्न फसला आहे . यापुर्वी याच ठिकाणी सराफ व्यापार्यांच्या पत्नीचे मंगळसुत्र पळवले गेले होते. तर एक मोटार सायकलही पळवुन नेण्यात आली असुन कोरोना पार्श्वभमीवर मोठ्या प्रमाणावर चोरीचे प्रमाण वाढले आहे .

घटना रात्री ७.४५ च्या दरम्यान घडली असुन सदर घटनेनंतर घटनेच्या ठिकाणी मोठा पोलिस फटा जमा झाला होता. रात्री ९.४५ पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. सदर घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
Top