परंतु देव स्वरुप येशुने, ' हे बापा यांना क्षमा कर '! असे अतिंम शब्द उच्चारले

कुर्डुवाडी,(राहुल धोका)-कुर्डुवाडी शहरात १०० वर्षापुर्वीचे ब्रिटीश कालीन सेंटमेरी चर्च असून धर्मगुरू रेव्ह.मोशे साने आहेत.आर सि चर्च धर्म गुरु रेव्ह फादर कनकराज ,लहान कळप चर्च धर्म गुरु रेव्ह.डेव्हिड बागुल,डब्लु एम ई चर्चचे धर्मगुरु रेव्ह.एस परमज्योति,इमानूएल चर्चचे धर्मगुरु रेव्ह. याकोब नवगिरे असून ८०० ते ९०० ख्रिस्ती बांधवाचे कुटुंब शहरात राहात आहेत.

येशु ख्रिस्तांनी शांती व प्रेमाची शिकवण दिली

    ख्रिसमस (नाताळ ) हा सण अत्यंत महत्वाचा असुन येशु ख्रिस्तांनी शांती व प्रेमाची शिकवण दिली आहे. पापापासून दुर रहा असा संदेश त्यांनी दिला आहे.ख्रिसमस निम्मित सर्व चर्चना सजवण्यात येते. त्याचप्रमाणे विद्युत रोशनाई केली जाते.चर्च बाहेर मंडप टाकले जातात. ख्रिस्ती बांधव अत्यंत आनंदाने हा सण साजरा करतात गायन ,भक्ति गिते या वेळी सादर केली जातात.दर वर्षी हा उत्सव मध्यरात्रीपर्यंत चालतो पण यंदा  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमाप्रमाणे उत्सव साजरा होत आहे.२३- २४ रोजी सांताक्लाँजच्या भेटीची परंपरा असून लहान मुलांना यावेळी भेट वस्तु दिल्या जातात.घरोघरी जावून हा उत्सव साजरा होतो, अशी माहिती रेव्ह.डेव्हीड बागुल यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना माहिती दिली.ख्रिस्ती बांधव या व्यतिरिक्त गुड फ्रायडे आणि इस्टर हा सणही शहरात साजरा करतात.

गुड फ्राइडे हा येशुंचा मानवी शरीराचा मुत्यु दिन

     गुड फ्राइडे हा येशुंचा मानवी शरीराचा मुत्यु दिन असून त्यांना क्रुसवर चढवुन त्यांचा छळ केला गेला,परंतु देव स्वरुप येशुने, ' हे बापा यांना क्षमा कर '! असे अतिंम शब्द उच्चारले. यावर तत्व शिक्षण या दिवशी दिले जाते .

ख्रिसमसनिम्मित सर्व ख्रिश्चन बांधवाना खुप खुप शुभेच्छा

      इस्टर हा मानव जातीला तारणारा दिवस. या दिवशी येशुंनी त्यांच्या मारिया आदि शिष्यांना दर्शन दिले. पुनरुत्थानाचा हा दिवस अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी येशुंनी दिलेले उपदेशाचे ख्रिस्ती बांधव पालन करतात.शांतीच्या मार्गाने उत्सव साजरे केले जातात. बायबलच्या संदेशा प्रमाणे शहरात मोठ्या संख्येने असणारे ख्रिस्ती बांधव शांतीच्या मार्गाने जीवन व्यतीत करत असून आज ख्रिसमस (नाताळ) असून त्यानिम्मित ज्ञानप्रवाह न्यूज परिवारातर्फे सर्व ख्रिश्चन बांधवाना खुप खुप शुभेच्छा.

ख्रिसमस (नाताळ) विशेष christmas special
 
Top