कुर्डुवाडी शहरात ३६ वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची परंपरा


कुर्डुवाडी,(राहुल धोका),२०/१२/२०२०-कुर्डुवाडी शहरात ३६ वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची परंपरा आहे. यंदा कोरोनामुळे सोहळा खंडीत होणार असे वातवारण होते,परंतु महाराष्ट्र सरकारने धार्मिक विधीसाठी ५० व्यक्तिना सशर्त परवानगी दिल्यानंतर शहरातील विठ्ठल मंदिरात यंदा अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सपंन्न झाला आहे. या वेळी निवृत पोलिस अधिकारी ह.भ.प.चंद्रकांत कांबळे हे व्यासपिठ चालक होते.
ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील सर्व किर्तन, प्रवचण यंदा रद्द केले आहेत. शासकिय नियमा नुसार सोशल डिस्टन्स पाळुन ज्ञानेश्वरी वाचन केले जात असुन त्यामुळे परंपरा अंखड राहिली आहे  
- ह.भ.प डाॅ जयंत करंदिकर
    यावेळी शहरातील भाविकांनी सर्व शासकीय नियम पाळत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सहकार्य केले असे मंदिर समिती व्यवस्थापकांनी सांगितले. 

कुर्डुवाडी येथे अखंड ज्ञानेश्वरी पारायण 
Kurduwadi dnyaneswri parayan
 
Top