खर्डीत ग्रामस्थांकडून जनता कर्फ्यु पाळला जाणार

पंढरपूर ,प्रतिनिधी- तालुक्यातील खर्डी येथील श्री सद्गुरु सिताराम महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आणि वार्षिक यात्रा यंदा कोरोनाच्या सावटामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भक्तांनी १२ ते १४ डिंसेबर दरम्यान खर्डीत येऊ नये.

या काळात मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खर्डीत ग्रामस्थांकडून जनता कर्फ्यु पाळला जाणार असल्याची माहिती खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक यांनी दिली आहे.


यावेळी सरपंच रमेश हाके,सदगुरु श्री सीताराम महाराज ट्रस्टचे अध्यक्ष दीपक रामचंद्र रोंगे व ग्रामस्थ उपस्थित होते .

मंदिरात केवळ विधिवत पुजाअर्चा आणि नित्योपचार करण्यात येणार

  सद्गुरु सिताराम महाराज देवस्थान हे पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्हयातील एक जागृत देवस्थान आहे. श्री सद्गुरु सिताराम महाराज यांची १३ डिंसेबर रोजी पुण्यतिथी आहे. प्रतिवर्षी पुण्यतिथील खर्डीत मोठा उत्सव आणि यात्रा भरत असते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे सदरचा उत्सव साधेपणाने मंदिरात केवळ विधिवत पुजाअर्चा आणि नित्योपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात इतर भक्तांना कुठल्याही प्रकारे दर्शन मिळणार नाही. तथापि मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सिताराम महाराज भक्तांनी १२ डिंसेबर ते १४ डिसेंबरपर्यत खर्डी येथे येऊ नये,असे आवाहन ग्रामस्थ तसेच सिताराम महाराज देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

      विशेष म्हणजे ,खर्डीतील उत्सवादरम्यान खर्डी ग्रामस्थांनी देखिल मंदिर परिसरात गर्दी करू नये, यासाठी या तीन दिवसांच्या काळात जनता कर्फ्यु पाळण्याचा देखिल निर्णय घेण्यात आला आहे.

    जगभरासह देशभरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. अशातच दुस-या लाटेची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर खर्डी गावामध्ये उत्सवा दरम्यान गर्दी जर झाली तर निश्चितच ग्रामस्थ तसेच येणा-या भक्तांमध्ये संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनामुळे खर्डीचा सद्गुरु सिताराम महाराज पुण्यतिथी उत्सव रदद Khardi's Sadguru Sitaram Maharaj's punyatithi canceled due to corona 
 
Top