भारतीय रेल्वेसाठी स्व-चालित गाड्या तयार करण्यासाठी रेल विकास मर्यादितने मागील दोन वर्षात या अत्याधुनिक कारखान्याची स्थापना आणि क्रियान्वयन केले.
         नवी दिल्‍ली,२६ डिसेंबर २०२०,PIB Mumbai-
कोविड-19 संबंधित लॉकडाऊन व आव्हाने असूनही भारतीय रेल्वेच्या रेल्वे विकास निगम मर्यादित (आरव्हीएनएल) या सार्वजनिक उपक्रमाने २५ डिसेंबर २०२० रोजी सुशासन दिनाच्या दिवशी, महाराष्ट्रातील लातूरमधील मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात पहिल्या रेल कोच शेलचे (सांगाड्याचे) उत्पादन झाल्याची घोषणा केली. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला आहे.


           मराठवाडा रेल कोच फॅक्टरी आधुनिक औद्योगिक व्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या महत्वाकांक्षी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.दरवर्षी २५० एमईएमयू / ईएमयू / एलएचबी / ट्रेन सेट प्रकारचे आधुनिक कोच तयार करण्याच्या प्रारंभिक क्षमतेसह या कारखान्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. रेखांकन योजनेत भविष्या तील बदलांसाठी पुरेसा वाव असल्याने या क्षमतेत लक्षणीय वाढ होऊ शकते.या प्रकल्पावर करण्यात आलेला खर्च ५०० कोटी रुपये असून जमिनीची किंमत १२० कोटी रुपये आहे.

भारतीय रेल्वेने लातूर येथे पहिल्या रेल कोच शेलचे उत्पादनाची केली घोषणा

  हा कारखाना ३५० एकर जागेवर उभारला असून यामध्ये ५२,००० चौरस मीटर अभियांत्रिकी पुर्व कार्याची इमारत शेड,तीन लाईन यार्ड,३३ केव्ही विद्युत सबस्टेशन, कॅन्टीन, सुरक्षा व प्रशासकीय विभाग आणि २४ एकरात निवासी वसाहती आहेत. कारखान्यातून नवीन इलेक्ट्रिकली इंटरलॉक्ड हरंगुल रेल्वे स्थानकात कोच हलविण्या साठी ५ किमी लांबीची रेल्वेमार्ग जोडणी देण्यात आली आहे. कारखाना अत्याधुनिक यंत्रणा आणि यंत्रसंच,माल हाताळण्याची व्यवस्था आणि विविध उपयुक्त सुविधांनी सुसज्ज आहे.

कारखाना अत्याधुनिक यंत्रणा आणि विविध उपयुक्त सुविधांनी सुसज्ज

     शाश्वत विकासासाठी प्रकल्पात विविध हरित उपक्रम राबविले आहेत ज्यात ८०० किलो वॅट क्षमतेचे छतावरील सौर उर्जा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्प, पावसाचे पाणी साठवण, १०,००० वृक्ष लागवड,एलईडी लाइटिंग, नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटीलेशन यांचा समावेश आहे. प्रशासकीय ब्लॉक देखील हरित इमारत संकल्पनुसार बांधला आहे.

        २८ ऑगस्ट २०१८ रोजी हा प्रकल्प मंजूर होताच, रेल्वे मंत्रालयाच्या मिनी-रत्ना पीएसयू रेल विकास निगम लिमिटेडने ३० ऑगस्ट २०१८ रोजी आपल्या जलद मार्गावरील टर्न-की अंमलबजावणी साठी संयुक्त कंत्राट दिले.१२ ऑक्टोबर २०१८ रोजी कामाला सुरुवात झाली.

      नजीकच्या काळात हा कारखाना अजून रेल्वे कोच सांगाडे तयार करेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय रेल्वे मेक इन इंडिया मिशनमध्ये सातत्याने योगदान देत आहे
 indian railways has been consistently contributing to the make in India mission
 
Top