वाशी रेल्वे पुलावरील पीडितेवरील हल्ल्याच्या घटनेची विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल...


 मुंबई ,दि.२५/१२/२०२०- मुंबई येथील वाशी रेल्वेच्या पुलावर एक तरुणीला रेल्वेतून खाली फेकून देण्याची घटना दि.२२ डिसेंबर, २०२० रोजी समोर आली आहे. यात पिडीत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून जबर मारहाण केल्याबाबत रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केले असून याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेतली आहे.

पिडीतेला मनोधैर्य योजनेअंतर्गत तात्काळ मदत आरोपीला तात्काळ पकडण्यास डॉ.गोऱ्हेंचे निर्देश

   यासंदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी रेल्वे पोलीस आयुक्त श्री.रवींद्र सेनगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. पिडीत मुलीवर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून बेशुद्ध अवस्थेत असल्याने अद्यापपर्यंत जबाब घेण्यात आला नाही. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असे श्री. सेनगावकर यांनी डॉ.गोऱ्हे यांना सांगितले.

  श्री.सेनगावकर व रेल्वे पोलिसांनी यांनी तत्परतेने केलेली कार्यवाही समाधानकारक आहे. त्याच प्रमाणे या घटनेसंदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी आरोपीला पकडण्याचे निर्देश दिले तसेच पीडित तरुणीला मदत मिळण्याबाबत काही सूचना श्री .सेनगावकर यांना दिल्या आहेत. 
यात
◆ पीडितेला मदत मिळण्याबाबत मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव पोलिसांनी तात्काळ विधी व न्याय प्राधिकरण यांच्याकडे पाठविण्यात यावा.
◆ आरोपींला शोधण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी यंत्रणेला आदेश देण्यात यावेत.
◆ पिडीत तरुणीचे आणि कुटुंबाचे समुपदेशन होण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात यावी.

     सदरील पीडितेच्या लढयात शिवसेना महिला आघाडी आणि स्त्री आधार केंद्रच्या कार्यकर्त्या त्यांना न्यायालयीन मदत, सामाजिक स्तरावरील मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. उपसभापती कार्यालयाच्या विशेष कार्यअधिकारी डॉ.अर्चना पाटील यांनीही घटनेचा तपशील जाणून हॉस्पिटल येथील डॉक्टरांशी संवाद साधून डॉ.गोऱ्हे यांच्यावतीने पीडितेच्या तब्येतीची चौकशी केली आहे.

वाशी रेल्वेच्या पुलावर एक तरुणीला रेल्वेतून खाली फेकून देण्याची घटना 
incident of a young woman being thrown down from a train on the vashi railway bridge
 
Top