पंढरपूर,२५/१२/२०२०- शहरामध्ये चंद्रभागा पात्रामधून वाळू उपसा जोरात चालू असून पंढरपूरचे महसूल व पोलिस यांचे दुर्लक्ष होत आहे.प्रशासन आणखी किती बळीची वाट पाहणार आहे अशी जनतेतून चर्चा होत आहे.

पंंढरपूरातील महिलेचा आठ दिवसांपूर्वी वाळू माफियांनी बळी घेतला होता.आता परत शहरातील वाळू उपसा जोमात सुरू झाला आहे. शहरा तील नदीच्या अनेक भागातून वाळू उपसा केला जात आहे.बंधाऱ्याच्या जवळून तसेच पुंडलिक मंदिरा जवळ मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू आहे. त्यामुळे बंधाऱ्याला , मंदिराला धोका होण्याची शक्यता आहे. बंधाऱ्याला चिटकून मोठे खड्डे पडले आहेत. वाळू माफियांचा रात्रीच्या १२.०० नंतर ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाळू उपसा चालू असतो याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे ? हे वाळू चोर रात्री दारूच्या नशेत पंढरपूर शहरातून व झोपडपट्टी भागातून वाळूने भरलेल्या गाड्या वेगाने चालवतात त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. रात्रीच्यावेळी नदीच्या कडेला वाळू चालू असताना दारूच्या पार्ट्या केल्या जातात. त्यामुळे झोपडपट्टी भागातील लोकांना त्याचा त्रास होत असून लहान मुलांच्या अंगावर गाडे घातलेचे प्रकार घडले आहेत. झोपड पट्टीमधील घरांवरती रात्री दगडफेक केली जात असून नागरिकांना महिलांना दमबाजीही केली जात आहे.

      त्यामुळे आम्ही न्याय कोणाला मागायचा अशा प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेेत.तरी या प्रकरणा ची सखोल चौकशी व्हावी ही जनतेतून मागणी होत आहे.

प्रशासन आणखी किती बळीची वाट पाहणार आहे 
how many more victims the administration is waiting for
 
Top