पंतप्रधान आवास योजना गृह प्रकल्पाबाबत आढावा बैठक

पंढरपूर,११/१२/२०२०-पंढरपूर नगरपरिषदच्या वतीने संतपेठ येथील सर्व्हे नंबर १७ ब येथे २०९२ घराचा गृह बांधणी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्ष नेते गुरुदास अभ्यंकर, माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांनी सर्व नगरसेवका समवेत ही बैठक आयोजित केली होती.

यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी या गृहप्रकल्प योजनेची व झालेल्या सर्व कामाची माहिती सर्व नगरसेवक यांना दिली.

यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले की,पंढरपूर शहरातील ज्या व्यक्तींना स्वतःच्या मालकीची घरे नाहीत अशा व्यक्तींना या योजनेतुन पहिल्या टप्प्यात ८९२ घर देण्यात येणार आहेत.यासाठी प्रति फ्लॅटची किंमत ८ लाख ४५०० राहणार आहे व त्यापैकी २ लाख ५० हजार रुपये शासन भरणार असून सहा लाख रुपये संबंधित व्यक्तीस भरावे लागणार आहेत. पंढरपूर शहरातील विशेषतः झोपडपट्टी व इतर भागातील सुमारे चार ते साडेचार हजार लोकांनी यापूर्वी या गृह प्रकल्पांमध्ये घर मिळण्याबाबत अर्ज केले होते त्या संबंधित व्यक्तीने रक्कम रुपये दहा हजार ऑनलाइन नगरपरिषदेकडे भरणे आवश्यक आहे.तसेच नव्याने सुद्धा अशा व्यक्तींना रक्कम भरता येईल.सदर रक्कम भरलेल्या व्यक्ती मधून लॉटरी पद्धतीने सोडतीद्वारे या फ्लॅटचे वाटप करण्यात येणार आहे. तरी ज्या व्यक्तींना स्वतःच्या मालकीचे घर नाही जे अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्तीने त्वरित ही रक्कम भरून आपला फ्लॅट बुक करावा असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक व नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांनी केले आहे .

    या बैठकीस माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, नगरसेवक व माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टे,नगर अभियंता नेताजी पवार ,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर,नगरसेवक राजू सर्वगोड,विशाल मलपे, संजय निंबाळकर,कृष्णा वाघमारे,विक्रम शिरसाट, डी राज सर्वगोड,इब्राहिम बोहरी,सुप्रिया डांगे रेणुका घोडके,रेहाना बोहरी,बसवेश्वर देवमारे, अमोल डोके,नवनाथ रानगट,धर्मराज घोडके  उपस्थित होते.
 
Top