सीईओ स्वामी यांनी दिला पहिला दणका

     पंढरपूर, ०२/१२/२०२० - चौदाव्या वित्त आयोगातील सतरा लाखाचा भ्रष्टाचार केल्या प्रकरणी चळे येथील ग्रामसेवक प्रसाद देवकर यांना निलंबीत करण्यात आले आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चळे गावच्या महिला सरपंच सौ. अनिता सरिक यांनी सोलापूर येथे जिल्हा परिषद  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली होती.त्या अनुुषंगाने मोहोळ येथील टी.पी. ओ.यांना चौकशी साठी नेमले होते.याबाबत चौकशी सुरू असताना ग्रामसेवक प्रसाद देवकर यांनी वेळोवेळी माहिती देण्यास व कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ग्रामसेवक देवकर यांना निलंबीत करण्यात आले आहे .

पंढरपूर तालुक्यातील चळे येथील ग्रामसेवक भ्रष्टाचार प्रकरणी निलंबीत Gramsevak from Chale in Pandharpur taluka suspended in corruption case
 
Top