माय नेम इज रिऍलिटी .......

कोठेही जा फक्त एकाधिकार
भ्रष्टाचार अनीती अन अहंकार माजला आहे
सर्वत्र रान त्यांनीच व्यापल आहे !!१!!

सत्ता असो नसो
प्रत्येकजन आपलंच खरं म्हणतो आहे
खुर्चीवरील मात्र मनांतलच दळतो आहे !!२!!

बुद्धिमान जाग्यावर बसूनच सल्ले देतो आहे
वांझोटें वादविवाद गाजत आहेत
त्यावरच राजकारण फिरते आहे !!३!!

कॅशलेस पेक्षा केअरलेस अधिक जाणवते आहे
कोण कोणाला सांगणार सर्वच अतिशहाने
स्वप्नातील इंद्रांना कोण शहाण करणार !!४!!

जनता फक्त अपेक्षा करत कूजत जाणार
प्रश्न आहे हे ग्रहण केंव्हा सुटणार ?!!५!!

चारोळ्यांच्या वनांत ... गावठी चिमटा :


हाती टाळ गळी माळ पायात चाळ
मुखात त्यांच्या राम
वरून सुदाम आतून मल्ल्या असा
आज राजकारणी वागतो आहे
मिळेल तसं चरतो आहे
जाईल तिथे फक्त स्वप्नंच पेरतो आहे "

ज्यांना ना चाड नीतीची ना सत्याची
त्यांची कशी होईल प्रगती ?
नशिबी त्यांच्या फ़क्त अधोगती!!

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००


 
Top