सत्य ! सत्य अन फक्त सत्य ..........
महात्म्यांचा सूर्यास्त तर
गुन्हेगारांचा सूर्योदय होतो आहे
स्वातंत्र्यात सज्जनांचे नव्हे
दुर्जनाचे साम्राज्य वाढते आहे !!१!!
जे पेरतील पैसा तेच विजयी
हीच संस्कृती रूजते आहे
सत्यास कोण वाली
गुन्हेगारीस राजाश्रय मिळतो आहे !!२!!
भोगवाद माजलेला चारो दिशा
संस्काराचा दुष्काळ आहे
मतांचा बाजार नितीचा लिलाव
दलालांचा सुकाळ आहे !!३!!
शिक्षण घेऊनही माणूस
पशूतूल्य वागतो आहे
स्वार्थासाठी डोळे असूनही
अंध होतो आहे !!४!!
कोण कोणाचा आधार
सारेच निगर्गट्ट अनुभवतो आहे
वासणेचा ज्वालामुखी
संत शिक्षक तुरूंगात दिसतो आहे!!५!!
पुराव्यांवर आधारीत न्याय
येथे सत्य निराधार आहे
कथोकल्पीत पुरावे
गुन्हेगार मुक्त फिरतो आहे !!६!!
धरणी माय धरणी माय
तुझे उपकार ऋण व्यक्त करू कसे ?
तू सोसतेस किती ?.!!
माय तू मनाने खूप विशाल
गोडवे गाऊ किती ?!!
संगणक युग आलं , बेरोजगारी माजली
शेतावर दबाव दररोज वाढतो आहे
माणूस पशुतुल्य पर्वा करतोय कुठे ?!!
विकासाचे नावावर झाड तोडली
समुद्रात अतिक्रमण
डोंगर फोडलं बोडक केलं
नद्या ओढ सार कोरड पाडलं
कोण जबाबदार याले?
आम्हीच होत आहोत
आमच्या विनाशाचे शिल्पकार
माय आता तरी बुद्धी दे !!
तुझ्या सेवेत आनंदाने,गीत सद्बुद्धीचे गाऊ दे
माणूस आहोत माणसासारखं
वागण्यासाठीच बुद्धी दे .......!!
आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००