हिशोब आयुष्याचा...

आयुष्याचा सूर्य आता
मावळातीला ढळतो आहें
हिशोब पूर्ण होणारच
आहें हें मी आता जाणतो आहें !!१!!

माझं ओझं होऊ नये
दक्षता घेत चालतो आहे
उगवत्या अन मावळत्या सूर्यास
वंदन करतो आहें !!२!!

जे जे भेटले जोडले त्यांचा मी ऋणी आहें
पण कारणंपरतवे जे
तुटले त्यांचीही क्षमा मागून
त्यांनाही जोडत चाललो आहें !!३!!

हजारो हातांचे बळ मला लाभत आहेत
म्हणूनच मी नेटाने विद्रोही वाट चालतो आहें !!४!!

आपण सर्वच माझ्यावर कृपा करत आहात
यामुळेच मी अजूनही कार्यरत आहें "!!५!!

मान अपमान अहंकार लोभ यातून
मुक्त होतो आहे
श्रमिक नाहींरे गटाना
मूळप्रवाहात आणतो आहे!!६!!

आनंद कोठडीया,जेऊर,ता.करमाळा
९४०४६९२२००


 
Top