इडा पीडा टळो बळीराजाचे राज्य येवो
पण विश्वात एकच करोडो संख्येने शेतकरी मोर्चा देशाच्या राजधानीत पण न्याय सोडा त्यांच्यावर "अश्रूंच्या कांड्या फोडल्या जात आहेत "
हे निषेधार्थ नाही का ? राम कोठे आहे ?
रामाचे भक्त कोठे आहेत ?

शेती अन शेतकरी : विदारक वास्तव :

माझे जीवन गाणे गाणे ......

शेतीला नाही पाणी
जीव होतो वेड्यावाणी !! १!!

कर्ज नाही फिटत
मातीची माया नाही तुटत !!२!!

आशा नाही सुटत
शेती पडीक नाही पटत !!३!!

जीवाला घोर , नरडयाला दोर्
चित्र खरं आहे , कसं जगावं सुचत नाही !!४!!

उत्पनाला भाव नाही
मातीशिवाय हाती कांही येत नाही !!५!!

राबल तरी पिकत नाही
कर्जाच व्याज देखील फिटत नाही !!६!!

ज्वारीवर काणी कोण देणार दाणापाणी ?!!७!!

टोलनाका..... शेतकऱ्यांचा आसूड ...

शेतकरी जागृत, पण संघटीत नाही
कोणावर विश्वास ठेवावा समजत नाही!!१!!

शेतीमालास भाव नाही वास्तव आहे 
दर ठरवण्याचा हक्क उत्पादकांना नाही!!२!!

नैसर्गिक आपत्ती अंदाज येत नाही 
तोंडाशी आलेला घास मातीमोल पर्याय नाही !!३!!

सरकारी अनुदान वेळेत नाही 
सावकारी फास सुटत नाही !!४!!

कोणतेही सरकार येवो कर्जमुक्ती होत नाही
कितीही योजना आल्या तरी 
आत्महत्या थांबत नाही !!५!!

आनंद कोठडीया,जेऊर ,
९४०४६९२२००


 
Top