फरारी आरोपी बीड जिल्ह्यातून जेरबंद

        कोल्हापूर, १७/१२/२०२०-शिरोळ पोलीस ठाणे अभिलेखावरील १९९६ सालच्या गुन्ह्यातील २४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरारी आरोपी बीड जिल्ह्यातून जेरबंद करण्यात गुन्हे शोध पथकातील यश आले आहे. पोलीस अधीक्षक कोल्हापूर,अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लज कार्यालय इचलकरंजी ,उपविभागीय पोलिस अधिकारी, जयसिंगपूर विभाग, जयसिंगपूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे अभिलेखा वरील फरारी आरोपी याची विशेष मोहीम राबवून आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले होते.

गेली 24 वर्षे पोलिस आपल्याला अटक करू नयेत म्हणून फरार

      त्याप्रमाणे एस एस कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरोळ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शना खाली शिरोळ गुन्हे शोध पथकातील कर्मचारी हे पोलीस ठाणे अभिलेखावरील फरारी आरोपी शोध मोहीम राबवीत असता गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की शिरोळ पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देऊन फरार असणारा आरोपी आसाराम उर्फ बंडू धोंडे माळी हा बीड जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची खात्री मिळाल्याने पोलिस पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकातील ठाणे अंमलदार यांनी विप्र नगर बीड जिल्हा बीड येथून सदर आरोपी ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव आसाराम उर्फ बंडू धोंडे माळी, वय 46,राहणार पिंपळगाव कानडा,तालुका गेवराई,जिल्हा बीड असे सांगून त्या सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी आपण १९९६ साली २४ वर्षांपूर्वी दानोळी,तालुका शिरोळ येथे मोलमजुरी करता आलो असता दानोळी गावातील भुपाल उर्फ बबन विठ्ठल माने यांचे सोबत भांडण झाले .त्या वाद-विवादा मध्ये त्यांचे डोक्यात व खांद्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी करून तिथून पळून गेल्याचे कबूल केले व गेली 24 वर्षे पोलिस आपल्याला अटक करू नयेत म्हणून आपण फरार झालो असे सांगितले.त्यानंतर सदर आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप हे करीत आहेत.

      सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक कोल्हापूर शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लज,कॅम्प इचलकरंजी जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर विभाग जयसिंगपूर रामेश्वर वैजने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सूळ,पोहेकॉ ज्ञानेश्वर सानप, पोहेकॉ हनुमंत माळी,पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी या पथकाने केली आहे.

२४ वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या फरारी आरोपीस केले जेरबंद - शिरोळ पोलिसांची कारवाई  Fugitive accused jailed for 24 years - Shirol police action
 
Top