यंदा सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा होणार का नाही ?

सोलापूर -कोरोना मारामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा होणार का नाही ? या संदर्भात भक्तांमध्ये तर्कवितर्क वर्तविण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांची भेट घेऊन या बाबतीत चर्चा केली. त्यांच्यासमवेत सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, नगरसेवक शिवानंद पाटील, नागेश भोगडे, विनायक विटकर, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून यात्रा साजरी करण्यात येईल . त्यामुळे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा साजरी करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशी विनंती आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांवतीने प्रशासनाला करण्यात आली.

यावेळी महापालिका आयुक्तांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की यासाठी जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन निर्णय घेऊ .
 
Top