विठ्ठल सहकारीचे इतिहासात प्रथमच सर्वात तरुण अध्यक्ष भगीरथ भालके

   पंढरपूर,(प्रतिनिधी) - स्व.आमदार भारत भालके यांच्यानंतर कारखान्याचे संचालक आणि त्यांचे पुत्र भगीरथ यांचीच या पदावर नियुक्ती व्हावी यासाठी विठ्ठल परिवारातून आग्रह होता. त्याप्रमाणे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे इतिहासात प्रथमच सर्वात तरुण असलेल्या भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड झाली.


नूतन चेअरमन भगीरथ भालके यांच्यासमोर मोठे आव्हान

     विठ्ठल कारखान्याची सध्याची स्थिती पाहता सुरु झालेला गाळप हंगाम हा नूतन चेअरमन भगीरथ भालके यांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे. शेतकर्यांची मागील उसाची बिलं,कामगारांचे पगार,निवृत्त कर्मचार्यांची देणी हे प्रश्न सोडविण्या साठी तातडीने प्रयत्न करणेे गरजेचे आहे. 

      कारखान्याचे वर्तमान संचालक व कै.औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते.परंतु संचालकांमध्ये झालेल्या बैठकीत भगीरथ भालके यांच्या नावावर एकमत झाले.यावेळी कल्याणराव काळे,दिनकर पाटील यांनी भालके यांचा सत्कार करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

        सहाय्यक निबंधक तांदळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.विठ्ठल कारखान्यावर सर्वात तरुण वयाचे चेअरमन म्हणून त्यांना मान मिळाला आहे.

विठ्ठल सहकारीचे इतिहासात प्रथमच सर्वात तरुण असलेल्या भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड 
for first time in history of vithal sahakar,youngest bhagirath bhalke was elected unopposed 
 
Top