तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी पंधरा लाखाचा निधी - आ. संजयमामा शिंदे

कुर्डुवाडी,(राहुल धोका),२३/१२/२०२० -येथील ग्रामपंचायत २०२० ते २०२५ या पंचवार्षिक निवडणुकीत करमाळा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायती पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध कशा होतील याकडे गावपुढार्‍यांनी लक्ष द्यावे असे आवाहन करतानाच बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी आपण कमीत कमी १५ लाख रुपयांचा निधी आमदार फंडामधून देऊ अशी घोषणा आ.संजय मामा शिंदे यांनी केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना आ.संजयमामा शिंदे म्हणाले की,पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत हा पायाभूत घटक आहे .त्यामुळे ग्रामपंचायत हाच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाचा पाय आहे.गटातटाचे राजकारण न करता गाव विकासासाठी गावातील मतदारांनी बिनविरोध पद्धतीने ग्रामपंचायत निवडली तर त्या गावाचा विकास निश्चितच होत असतो.करमाळा तालुक्या तील उमरड,शेटफळ,कु.केडगाव,अर्जुननगर , मिरगव्हाण,पाडळी,पांडे,पोटेगाव,बाळेवाडी , घारगाव,फिसरे,करंजे,कोळगाव,दिलमेश्वर,कुंभेज, सरपडोह,गुळसडी,ढोकरी,जेऊरवाडी,कोंढेज,झरे, शेलगाव (क),सौंदे,हिवरे,निमगाव,साडे,सालसे, आळसुंदे,नेरले,हिसरे,पांगरे,पाथर्डी,सांगवी, मलवडी,कविटगाव,हिवरवाडी,अळजापूर,देवीचा माळ ,वडगाव ,पुनवर देवळाली,बोरगाव,बिटरगाव, पोथरे,भोसे,रोशेवाडी,जातेगाव,पिंपळवाडी,सावडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.या ग्रामपंचायतींपैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात असे आवाहन आ.संजयमामा शिंदे यांनी तालुकावासियांना केले आहे.


तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी पंधरा लाखाचा निधी - आ.संजयमामा शिंदे 
fifteen lakh fund for unopposed gram panchayat in the taluka - mla sanjay mama shinde 
 
Top