पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी माता ते काली माता सायकल टूरचे झाले प्रस्थान

   पंढरपूर,(प्रतिनिधी),२०/१२/२०२० - संत गाडगे महाराज स्मृतीदिनी म्हणजे २० डिसेंबर रोजी पर्यावरण व आरोग्य रक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी वर्ल्ड पीस फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिगंबर भोसले व नवयुवक इंजि. सचिन राऊत या दोघांची पंढरपूर ते साहापूर म्हणजेच रुक्मिणीमाता ते कालीमाता अशा सायकल टूरचे प्रस्थान सकाळी १०:०० वाजता झाले .पंढरपूर मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष नागेश भोसले, नगरपरिषदचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, नगरसेवक दत्तात्रय धोत्रे, राष्ट्रवादीचे युवा नेते संदिप मांडवे आदि मान्यवरांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

सायकल टूर २२०० किलोमीटरची २४ दिवसांची

   महाराष्ट्र सायकलिंग असोशिएशन पुणे,पंढरपूर सायकल असोशिएशन,पंढरी सायकल मॅरेथाॅन यांचे संयुक्त विद्यमाने त्यांच्या प्रेरणेने पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी,कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी,स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी, विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी,भौगोलिक उत्सकतेसाठी, ऋतूबदलाचा अभ्यास करण्यासाठी, एकात्मतेचा संदेश देण्यासाठी,वैविध्यतेचा अनुभव घेण्यासाठी, इंधन बचतीचे महत्व आजमावून सांगण्यासाठी,परकीय चलन वाचविण्या साठी, संत गाडगे महाराजांच्या स्मृतीदिनी सायकल टूरचे आयोजन केले आहे. हि सायकल टूर २२०० किलोमीटरची असून २४ दिवसांची आहे.दिगंबर भोसले यांनी आजपर्यंत दिडलाख किलोमीटर सायकल प्रवास केला असून, ते गेली ३५ वर्षे सायकल प्रवास करीत असून, विश्वशांतीचा संदेश देत असल्याची तसेच ८ लाख किमी कारप्रवास, ४ लाख किमी दुचाकी प्रवास केल्याची माहिती आयोजक सागर कदम, राष्ट्रवादीचे युवा नेते संदिप मांडवे, साहित्यिक राधेश बादले पाटील यांनी दिली.

    सारकलस्वारांनी प्रथम विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायकल टूरच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.सायकलस्वारांसह मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले.सायकलस्वारांना श्री गाडगे महाराज मराठा धर्मशाळा, पंढरपूर येथे कालिमाता प्रवास व प्रबोधनासाठी मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल टूरचे प्रस्थान झाले.अनेक मान्यवरांनी पंढरपुरात ठिकठिकाणी सायकल स्वारांचा पुष्पाहार घालून स्वागत व सत्कार केला.
 
     या सायकल टूरच्या प्रस्थानावेळी सायकल स्वारांना प्रोत्साहन देण्यासाठी गादेगावचे संपादक जैनुद्दीन मुलाणी, नानासाहेब शिंदे,मुकेश निर्मळे, विठ्ठल भुमकर, आप्पासाहेब माने, गणेश थिटे, राजाभाउ राऊत, राजाभाऊ काळे,निलेश कदम, ओंकार चव्हाण यांचेसह पंढरपूर पंचक्रोशीतील  विविध क्षेत्रांमधील मान्यवर हजर होते. 

पर्यावरण,आरोग्यरक्षणासाठी,कोरोना मुक्तीचा संदेश सायकल टूर environment,healthcare,corona liberation message cycle tour
 
Top