आलेली कोणतीही संधी तरुणाईने कधीही गमावता कामा नये

पंढरपूर,(प्रतिनिधी),१४/१२/२०२० - गावच्या विकासाची संधी तरुणाईला खुणावत असून विकासाची आलेली कोणतीही संधी तरुणाईने कधीही गमावता कामा नये. कारण यातूनच रोपळे विकासाचा पॅटर्न गतिशील होण्यास मदत होणार आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले.

    पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे रोपळे विकास प्रतिष्ठान आयोजित नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार आवटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रा. शिवाजीराव काळुंगे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड, रोपळे विकास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक शिवाजी भोसले,  माजी संचालक विलास भोसले, संचालक परमेश्वर गणगे, रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य बाळासाहेब पाटील, पत्रकार सिद्धार्थ ढवळे, सागर चवरे,  माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ, डॉ. महावीर शहा, हनुमंत कदम, रावसाहेब कदम, हर्षल शहा, माउली जाधव, सुभाष रणदिवे, प्राचार्य डॉ.सुरेश ढेरे, हरिश्चंद्र ढेरे, डॉ.सुशील शिंदे, अशोक पाटोळे, प्रा.नामदेव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोपळे विकास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक शिवाजी भोसले यांनी केले.

      पुढे बोलताना आवटे यांनी रोपळे विकास प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अशा प्रतिष्ठानच्या पाठीमागे ग्रामस्थांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोपळे विकास प्रतिष्ठान व स्पर्धा संयोजन समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

गावच्या विकासाची संधी सोडू नका - आवटे Don't miss out on village development opportunities: Awate
 
Top