सहकार शिरोमणी व सिताराम साखर कारखान्याचे ऊस बील वाटप सुरु

         पंढरपूर , (प्रतिनिधी), दि.२३/१२/२०२० - सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास चालु गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन.२०००/- व सन २०१८-१९ मधील उर्वरीत एफआरपीची रक्कम तसेच सिताराम महाराज साखर कारखाना सन २०१८-२०१९ मधील ऊस बीलाच्या पोटी प्रती मे.टन. रु.५००/- प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक, पंढरपूर येथे गटवार ऊस बीलाचे वाटप सुरु आहे, अशी माहिती सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा सिताराम महाराज साखर कारखान्याचे मार्गदर्शक कल्याणराव काळे यांनी दिली.

       सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२०-२१ मधील ऊस उत्पादक शेतकज्यांचा दि.१७/११/२०२० ते ३०/११/२०२० या पंधरवड्यामध्ये गळीतास आलेल्या ऊसास पहिला हप्ता प्रती मे.टन.रु. २०००/- प्रमाणे सुरु असून गळीत हंगाम २०१८ -२०१९ मधील शेतकऱ्यांची उर्वरीत एफआरपी रक्कम ही दि. २४/१२/२०२० पासून पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेतून गटवाईज वाटप करण्यात येणार आहे. ऊस तोडणी वाहतुकीचे बीले कमिशनसह प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्था,पंढरपूर येथे गट वाईज सुरु करण्यात आलेले आहेत.


२०१८-२०१९ मधील ऊस बीलाच्या एफआरपी पोटी प्रती मे.टन रु.५००/- 

सिताराम महाराज साखर कारखाना खर्डीचे सन २०१८-२०१९ मधील ऊस बीलाच्या एफआरपी पोटी प्रती मे.टन रु.५००/- प्रमाणे सोमवार दि. २१/१२/२०२० रोजी गटवाईज पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँक येथे वाटप सुरु करण्यात आले असल्याचेही सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले.

सहकार शिरोमणी व सिताराम महाराज साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना आपल्या गटा नुसार बीलाचे वाटप करण्यात येणार असून बँकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी होवू नये म्हणून कारखान्याच्या शेती विभागामार्फत संबंधीत शेतकर्यांना ऊस बीलासंदर्भात निरोप दिल्यानंतरच बँकेत जावे असे आवाहन काळे यांनी केले आहे.

सहकार शिरोमणी व सिताराम साखर कारखान्याचे ऊस बील वाटप सुरु -चेअरमन कल्याणराव काळे distribution of sugarcane bills of sahakar shiromani and sitaram sugar factory started - chairman kalyanrao kale 
 
Top