जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत वृद्धाश्रमात धान्य वाटप

पंढरपूर, ०३/१२/२०२०- आज गुरुवार दिनांक ०३/१२/२०२० रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत शहीद मेजर कुणाल गोसावी shaheed major kunal gosavi प्रतिष्ठानच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रम matoshri vrudhashram गोपाळपूर येथे डिसेंबर २०२० या महिन्याचे संपूर्ण धान्य वाटप माजी नगरसेविका व वीरमाता सौ वृंदादेवी मुन्नागिर गोसावी व वीर पत्नी उमा आणि उमंग कुणाल गोसावी परिवार यांच्यातर्फे करण्यात आले.

    याप्रसंगी अमित व समीर गोसावी,निलीमा आणि वृषाली गोसावी यांनी जाऊन आपुलकीने वृद्धांची विचारपूस चौकशी केली व जे जे काही आवश्यक असेल त्या सर्व गरजांची पूर्तता करण्याचे आश्‍वासनही दिले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानमधील संचालक महेश म्हेत्रे,महेश गोसावी,श्री डिंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन प्रतिष्ठानचे चेअरमन वीरपिता मुन्नागीर गोसावी यांनी केले. वृद्धाश्रमातील व्यवस्थापकांनी गोसावी प्रतिष्ठानच्या सर्व उपस्थितीथांचे गुलाब पुष्प देऊन आभार मानले.
 
Top