सिताराम महाराज साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

पंढरपूर,(प्रतिनिधि),दि.२१/१२/२०२० - खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याच्या ८ व्या बॉयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगाम शुभारंभ संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रा.शिवाजी काळुंगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शोभाताई काळुंगे,चेअरमन धनश्री पतसंस्था व मल्टीस्टेट बँक,मंगळवेढा यांचे हस्ते गव्हाण पुजन तसेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला.

    प्रारंभी कारखान्याचे कर्मचारी सुनिल रोंगे व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच कामगार प्रशांत बुरांडे, देविदास वाघमारे, रामेश्‍वर पवार व बाळासाहेब जाधव यांचे शुभहस्ते बॉयलर अग्नि प्रदिपन सोहळा व कारखान्याचे काटा पुजनाचा कार्यकम कर्मचारी आण्णासाहेब थिटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सिमा आण्णासाहेब थिटे या उभयतांचे शुभहस्ते करण्यात आला.

दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाना बंद ठेवावा लागल्यामुळे आर्थिक नियोजन विस्कळीत

      प्रास्ताविकात बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक समाधान काळे म्हणाले की,मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाना बंद ठेवावा लागला त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले.परंतु धनश्री परिवाराने सिताराम कारखान्यास आर्थिक मदत करुन कारखाना चालू करणेकामी चालना दिल्याचे नमुद केले. 

फक्त ४० दिवसात कारखान्याचे पुर्ण ओव्हरहॉलींग व मेटनन्सची कामे पुर्ण

      कारखान्याचे संचालक महादेव देठे म्हणाले की,आर्थिक निधीची उपलब्धता झालेनंतर कामगारांनी फक्त ४० दिवसात कारखान्याचे पुर्ण ओव्हरहॉलींग व मेटनन्सची कामे पुर्ण केली आहेत. 

विठ्ठल परिवार हा संघर्षातुन तयार झालेला परिवार

       सहकार शिरोमणी कारखान्याचे संचालक  सुधाकर कवडे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, विठ्ठल परिवार हा संघर्षातुन तयार झालेला परिवार असुन या परिवारास संघर्षातुन आपले ध्येय गाठणेकामी वाटचाल करणेचे संपुर्ण ज्ञान आहे . 

     शिवाजीराव काळुंगे यांनी सांगितले की, सिताराम महाराज साखर कारखान्याने पुढील ४ महिन्याच्या हंगामात जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करुन व सहवीज निर्मिती प्रकल्पातुन वीज एक्सपोर्ट करुन आर्थिक घडी बसविणे आवश्यक आहे. 

  धनश्री पतसंस्थेचे चेअरमन सौ.शोभाताई काळुंगे म्हणाल्या की, कामगारांनी सकारात्मक वृती ठेवुन चांगले परिणाम देणे गरजेचे आहे. कर्मचा-यांची आपल्या कामावर व संस्थेवर निष्ठा असणे गरजेचे आहे .

पवारसाहेबांचे सहकार शिरोमणी व विठ्ठल कारखान्यास सहकार्य

    अध्यक्षपदावरुन बोलताना सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले की, मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कारखान्यासमोर अनेक आर्थिक प्रश्‍न तयार झाले व त्यातुन संयमाने आर्थिक अडचणी सोडवुन शेतक-यांच्या २०१८ -१९ मधील ऊस बिलाच्या एफआरपी पोटी प्र.मे.टन रु.५००/- प्रमाणे रक्कम गटवाईज बँकेत जमा केली असून कारखान्याचे चिटबॉयमार्फत संबंधीत शेतक-यांस कळविणेत आलेले असून ती रक्कम घेवुन जावी. दुष्काळी परिस्थितीमुळे बँकांच्या व्याजाचा डोलारा व हप्ते याकरीता बँक कर्जासाठी वेळोवेळी माजी कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली व पवारसाहेबानी सहकार शिरोमणी व विठठल कारखान्यास सहकार्य केल्याचे आर्वूजन सांगितले.

     या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन नारायण मोरे, सिताराम महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणेश ठिगळे, कार्यकारी संचालक समाधान काळे, विठठल सह.साखर कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे, महादेव देठे,माजी संचालक तुकाराम माने,तानाजी जाधव, भारत भुसे,राजसिंह माने, गंगथडे भाऊ,बिभीषण ताड, सोपान तोडकर, पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड राजेश भादुले आदी उपस्थित होते. 

     जनरल मॅनेजर डी.के.शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वर्क्स मॅनेजर भिंगारे,टेक्नीकल मॅनेजर शिंदे,शेती अधिकारी आसबे,चिफ अकौटंट शिंदे उपस्थित होते. प्रशासन अधिकारी डी.एम. सुतार यांनी आभार व्यक्त केले. 
 
Top