रेल्वे प्रवासी व नागरिकांसाठी कराड रोड,रेल्वे गोदामापर्यंंत ओहर ब्रिज बांधण्यात यावा 

   पंढरपूर, २५/१२/२०२०-पंढरपूर रेल्वे स्थानक येथे महाप्रबंधक संजिव मित्तल,डि.आर.एम.शैलेश गुप्ता, डि.सी. एम.प्रदिप हिरडे,चिंचवडे,पी.आर.पिसे आदी भेटीसाठी आले होते.पंढरपूर स्टेशन प्रबंधक श्री चनागौडा,निरिक्षक श्रीवास्तव, राजपाल चावला, सी.सी.आय.शिंदे आदी उपस्थित होते. 


   याप्रसंगी पंढरपूर रेल्वे स्थानकाचा,रेल्वेस्थानकावरील सुविधेचा, रेल्वे हॉस्पिटलचा आढावा घेण्यात आला. यावेळी कोरोना संदर्भातील व प्रामाणिक नागरिकांना परमेश्वराची मदत या संदर्भातील पटनाट्य सादर करण्यात आले. पंढरपुरातील नागरिकांच्या अडीअडचणी सांगण्यात आल्या. पंढरपूर ही मोठी व्यापार पेठ असुन तिर्थक्षेत्र आहे. पंढरपूर तालुक्यात १२ महिने प्रवाशांची ये जा चालू असते. माल वाहतुक ही मोठ्या प्रमाणात असते. मोठ्या शहरांमध्ये तसेच परदेशी बाजार पेठेमध्येही माल खरेदी विक्री करण्यात येतो, मालाचीही मोठ्या प्रमाणात आवक, जावक असते. व्यापार, शिक्षण, पर्यटनासाठी नागरिकांची ये जा सुरुच असते आणि दूरच्या प्रवासासाठी कुर्डुवाडी, दौंड, पुणे या जंक्शनला जावे लागते. नागरिकांसाठी रेल्वे प्रवास हा वाहतुकीसाठी मोठा आधार असतो. 

कराड रोड,रेल्वे गोदामपर्यंत ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा

  सर्व नागरिकांची सोय व्हावी यासाठी पंढपुर-पुणे, पंढरपूर-मुंबई, पंढरपूर-शिर्डी या गाड्या दररोज सुरु कराव्यात अशी मागणी पंढरपूरचे आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी केली. रेल्वे प्रवासी व नागरिकांसाठी रेल्वे स्टेशन मागील बाजु कराड रोड,रेल्वे गोदामपर्यंत ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा अशी मागणी केली. जेणेकरुन परदेशीनगर येथुन जुना कराड नाका येथे पॅसेंजरना व नागरिकांनाही सुरक्षीत ये जा करता येईल व वेळेतही बचत होईल असे विवेक परदेशी यांनी महप्रबंधक यांना सुचवले व तसे निवेदनही दिले.

    समाजसेवक नवनाथ रानगट यांनी महाप्रबंधक श्री मित्तल यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ प्रिया भिंगे, शिरिष कटेकर, बादलसिंह ठाकुर,जितेंद्र बनसोडे,शितल येळे,महेश म्हेत्रे,श्री रजपुत आदी उपस्थित होते.

पंढरपूरहून पुणे,मुंबई,शिर्डी या रेल्वे दररोज चालु करण्याची मागणी 
demand for daily operation of pandharpur to pune,mumbai, shirdi trains
 
Top