गेल्या वर्षीच्या भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित खात्यावर जमा करा अन्यथा रस्त्यावर उतरणार 
  मोहोळ येथिल मौजे कोन्हेरी गावचे ५८ शेतकरी लाभापासून वंचित असून यासह इतर मागण्यां साठी पंढरपूर येथे भीमाकाठी पुंडलिक मंदिरा जवळ १०/१२/२०२० रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

गेल्यावर्षी भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावोगावच्या शेतकऱ्यांचे झालेल्या पिकांच्या व बागांच्या आतोनात नुकसानीमुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपये कर्जमाफी जाहीर केली होती ती दुसऱ्या वर्षी महापूर येऊन गेला तरीही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही. तसेच पंढरपूर तालुक्यातील पिकांचे नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही ती त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी अशा मागणीचे निवेदन जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना प्रत्यक्ष भेटून दिले.

   तसेच चालू वर्षी पंढरपूर,मोहोळ तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे, बागांचे नुकसान होऊन मुकी जनावरेही मृत्युमुखी पडली होती. या सर्वांचे मिळून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले नाहीत ते त्वरित जमा करावेत तसेच फडणवीस सरकारच्या काळातील पंढरपूर तालुक्यामधील तीन हजार तीनशे शेतकरी आजही कर्जमाफी पासून वंचित आहेत त्यामुळे त्यांना नवीन कर्ज घेणे अडचणीचे झाले आहे तरी सहकार मंत्री व सहकार आयुक्त यांनी लक्ष घालून शासनाच्या नियमाप्रमाणे झालेली कर्जमाफी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशीही मागणी केली असल्याचे देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील ५८ शेतकऱ्यांची गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांची झालेली नुकसान भरपाई अद्याप त्यांच्या खात्यावर जमा नाही याबाबत मोहोळ तहसीलदार यांनी बाधित शेतकऱ्यांना व जनहित शेतकरी संघटनेला चार महिन्यापूर्वी एक महिन्यात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो असे आश्वासन दिले होते ते त्वरित जमा करावे.

   अन्यथा दि १०/१२/२०२० रोजी दुपारी १२:०० वाजलेपासुन पंढरपूर येथील भीमा नदीच्या काठावर असलेल्या पुंडलिक मंदिराच्याजवळ न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही देशमुख यांनी दिला. 

 यावेळी कौठाळी,गोपाळपूर,चळे,आंबे,ओझेवाडी, सुस्ते, मुंडेवाडी,तारापूर,उचेठाण,बठाण,अर्धनारी, बेगमपूर, अरबाळी व इतर गावातील शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील देशमुख यांनी केले .

   यावेळी उपस्थित राजाभाऊ हबाळे, श्रीकांत नलवडे ,सचिन आटकळे,सुरेश नवले,विकास जाधव,सुभाष शेंडगे ,कुमार गोडसे,नाना मोरे , मारुती भुसनर यांचेसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित खात्यावर जमा करा अन्यथा रस्त्यावर उतरणार - प्रभाकर देशमुख debt waiver of farmers credited to account immediately otherwise it will take to streets - prabhakar deshmukh
 
Top