ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची पदवीधर,शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीवर प्रतिक्रिया

फिटे अंधाराचे जाळे , झाले मोकळे आकाश

मुंबई /पुणे दि.०४/१२/२०२० -विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदार संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचे यश मिळालेले आहे. गेले एक वर्ष महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्याच्या वर्षापूर्तीच्यानिमित्त मी असे मांडले होते की, 'कोंडलेल्या लोकशाहीला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली' तसेच एक दुसरे पुढचं पाऊल असे म्हणू शकते की, 'फिटे अंधाराचे जाळे ,झाले मोकळे आकाश'. कायम जे मतदार संघात विशेषतः नागपूर दीर्घकाळ आणि पुणे हे गेली बारा वर्षे हा काळ भारतीय जनता पक्षाकडे होता, ते देखील महाविकास आघाडीला मिळालेले आहे.

अमरीश पटेल यांचे स्वतःचे कार्य असल्यामुळे त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झालेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एककलमी विरोधासाठी विरोध हा कार्यक्रम राबवूनदेखील मतदारांनी उलट महाविकास आघाडी सोनिया गांधी,अशोक चव्हाण तसेच सगळ्या मंत्रिमंडळामधील सर्व माननीय उद्धवसाहेबांचे सहकारी विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाकी सर्व घटक यांच्याबद्दल मतदारांनी अतिशय सकारात्मक भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यासोबत हेदेखील स्पष्ट केलेला आहे की, बेरजेच्या राजकारणाबरोबर त्यांना प्रत्येक पक्षाच्या स्वतःच्या पक्षाच्या मतदाराबरोबर त्याच्या बाहेर असणारा जो मतदार आहे त्यांनी देखील आघाडीवरती शिक्कामोर्तब केलेले आहे.

मतदारांचा विश्वास आपण का गमावला याचा विचार भारतीय जनता पक्षाने करावा

शिवसेनेचे सहयोगी सदस्य असलेले श्रीकांत देशपांडे ही जागा मुळात आमच्याकडे नव्हती, ते अपक्ष म्हणून निवडून आले होते ते परत आमच्या कडे आले होते.त्यामध्ये यश मिळालेले नाही याचं काय कारण आहे हे निश्चितपणे बघू शकतो. त्याच्यामध्ये शिवसेनेबद्दल अपप्रचार केला भोपळा मिळाला त्यामुळे एकच जागा होती आणि त्याच्या मध्ये तेवढे यश मिळाले नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या दोन्ही मतदारसंघांत वर्षानुवर्षे मतदारांचा विश्वास भारतीय जनता पक्षाने आपण का गमावला याच्या संदर्भात न विचार करता केवळ शिवसेनेबद्दलच्या द्वेष भावनांनी टीका केली. वेगवेगळे जे सल्ले दिले गेले आहेत की शिवसेनेने एकटे लढले पाहिजे. ते सर्व जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचे अपयश झाकण्यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे त्याच्यात काही शंका नाही.

माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि संपूर्ण या महाविकास आघाडी सरकारवर जे शिक्कामोर्तब जनतेने केलेले आहे त्याच्यामुळे निश्चित आमचा हुरूप वाढलेला आहे. एक वर्ष पूर्ण झालं त्याच्या निमित्ताने एखादी चांगली भेट मिळालेली आहे.

मुंबई,पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारची आमची घोडदौड चालू राहील अशी मला खात्री वाटते.

आज ना उद्या लवकरात लवकर आमची नेतेमंडळी पुढच्या वाटचालीबद्दल निवडणूक कशा लढायच्या याबद्दल जरूर भूमिका घेतली. ज्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि अनेक इतर घटकांनी आम्हाला जी मदत केली, त्याबद्दल मतदारांच्या मनापासून आभार मानते.

विजय झालेल्या सर्व उमेदवारांचे मनापासून त्यांना अभिनंदन करते शुभेच्छा देते. त्याच सोबत ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या ठिकाणी यश मिळाले नाही तिथे सुद्धा काम वाढविण्याच्या दृष्टीकोनातून आपण काम करू अशा प्रकारचा संकल्प आहे हे नमूद करु इच्छिते अशा शब्दांत आपल्या भावना ना.डॉ.नीलम गोऱ्हे nilam gorhe, शिवसेना प्रवक्त्या यांनी व्यक्त केल्या. 
 
Top