९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपये जमा केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन
नवी दिल्ली,२६/१२/२०२०- ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,000 कोटी रुपये जमा केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. गेल्या सहा वर्षात मोदी सरकारने आपला प्रत्येक निर्णय देशातील गरीब, शेतकरी आणि वंचितांना केंद्रस्थानी ठेवून घेतला आहे, ज्यामुळे त्यांना त्यांचे अधिकार मिळाले आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत, असे अमित शाह यांनी ट्वीट करून सांगितले आहे.


    पीएम किसान ही देखील अशीच एक अभूतपूर्व योजना आहे ज्याद्वारे पंतप्रधान मोदी दर वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये जमा करत असतात. अमित शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पीएम किसानचा आणखी एक हप्ता जारी करताना ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपये जमा केले आहेत, ज्यांच्या मदतीने ते आपल्या शेतीविषयक गरजांची पूर्तता करू शकतील.शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणा साठी मोदी यांच्या समर्पण आणि संकल्पाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो,असे शाह यांनी सांगितले.


     त्यापूर्वी आज केंद्रीय गृहमंत्र्यांनी महरौली येथे शेतकऱ्यां सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेले भाषण ऐकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे यावेळी अमित शाह यांनी सांगितले. मोदी सरकारची कृषी कल्याणविषयक सर्व धोरणे आणि कृषी सुधारणांबाबत यावेळी सर्व शेतकऱ्यांनी अतिशय उत्साहाने आणि आवेशाने आपला विश्वास व्यक्त केला.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडीच वर्षाच्या काळात सुमारे १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ९५,००० कोटी रुपये जमा केले आहेत.

     अमित शाह यांनी २०१४ पूर्वीची आणि त्यानंतरची कृषी विषयक आकडेवारीच्या तुलनात्मक अभ्यासाची माहिती देत सांगितले की २०१३-१४ मध्ये खाद्यान्न उत्पादन केवळ २६५ दशलक्ष टन होते तर आता त्यात वाढ होऊन ते २९६ दशलक्ष टन झाले आहे. २०१३-१४ मध्ये शेतीविषयक अर्थसंकल्पीय तरतूद केवळ २१,९३३ कोटी होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता शेतीविषयक तरतुदीत वाढ होऊन ती 1,34,399 कोटी रुपये झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे देखील सांगितले की २००९-१४ दरम्यान तांदूळ आणि गहू यांच्या खरेदीसाठी केवळ ३,७४,000 कोटी रुपये खर्च होत होते तर २०१४-२०१९ च्या दरम्यान ८,२२,००० कोटी रुपयांची तांदूळ आणि गहू खरेदी झाली आहे. याशिवाय मोदी सरकारने मृदा आरोग्य पत्रिका, नीम कोटेड युरिया सारखे काही उपक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतला ज्याचा फायदा देशभरातील शेतकऱ्यांना झाला. सुमारे १००० बाजारांना ऑनलाईन जोडून देशभरातील शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल यासाठी प्रयत्न केले. पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा देशातील साडेसहा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना झाला. सुमारे १०,००० कृषी उत्पादक संघटना
(एफपीओ) स्थापन करण्यात आल्या.
 
Top