पत्र्याच्या बंद घरातून ९२ हजाराची रक्कम चोरीला गेली

   पंढरपूर,२४/१२/२०२०- गोपाळपूर,तालुका पंढरपूर येथे दि. २२/१२/२०२० रोजी सायंकाळी येथील मातोश्रीनगरमधील पत्र्याच्या बंद घरातून ९२ हजाराची रक्कम चोरीला गेली असून यामध्ये पन्नास हजार रुपये रोख,२० हजार रुपयांचे अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे कानातील वेल,वीस हजार रुपयांचे अर्धा तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे  दागिने गेेेेले होते. मातोश्रीनगर,गोपाळपूर,तालुका पंढरपूर फिर्यादीचे पत्र्याचे बंद घराचे कुलूप तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश करून घरांमधील कपाटाखालील सोने-चांदी व पैसे ठेवलेला लहान डबा त्यामधील सोन्याचे दागिने आणि पैसे कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी मुद्दाम लबाडीने चोरून नेले म्हणून फिर्यादी निर्मला प्रमोद जाधव ,वय ५० वर्षे, धंदा मजुरी, राहणार मातोश्रीनगर, गोपाळपूर , तालुका पंढरपूर यांनी तक्रार दिली होती .या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोटरसायकलचा हप्ता भरण्यासाठी घरातून पैसे व दागिने चोरल्याची कबुली

     सदर गुन्ह्याचे घटनास्थळी पंचनामा करण्यात आलेला असून साक्षीदार लोकांकडे तपास केल्या नंतर सदर वेळी फिर्यादीचे व तिचे घरातील लोक बाहेर गेले असताना सदर ठिकाणी फक्त आरोपी ओंकार प्रमोद जाधव,वय वर्षे २०, राहणार गोपाळपूर हा आला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचा तपास केला असता त्याने मोटरसायकलचा हप्ता भरण्यासाठी घरातून पैसे व दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याचेकडे गेलेली रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने याबाबत तपास करता त्याने सांगितले की त्याने मोटरसायकलचे ४१ हजार दोनशे रुपयाचे हप्ते भरले. उर्वरित रक्कम सोन्या-चांदीचे दागिने वस्तू आणि रक्कम घरामध्ये असलेले जड सामान ठेवलेल्या कॅरेटमध्ये दागिन्यांचा डब्बा व उर्वरित रक्कम आठ हजार दोनशे रुपये ठेवले बाबतचे निवेदन करून रोख रक्कम व दागिने काढून देण्याची तयारी दर्शवली . आज रोजी दोन पंचांसमक्ष सविस्तर निवेदन पंचनामा करून वरील जप्त मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

     सदरची कारवाई ही उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील मंगळवेढा उपविभाग मंगळवेढा व विक्रम कदम,पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी,पंढरपूर विभाग यांचे मार्गदर्शना खाली पंढरपूर तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण अवचर,पोलीस हेडकॉन्स्टेबल भीमराव गोळे,पोलीस हेडकॉन्स्टेबल पांडुरंग ढवळे,पोलीस नाईक श्रीराम ताटे यांनी केली आहे

मोटरसायकलचा हप्ता भरण्यासाठी घरातून पैसे व दागिने चोरल्याची कबुली 
Confession of stealing money,jewelery from house to pay installment of motorcycle
 
Top