पालवी प्रकल्पास संगणक संच भेट तसेच २१,०००/- रु देणगी प्राप्त   पंढरपूर - अकलुज येथील डॉ.अतुल विनोदकुमार दोशी, यांनी वाढदिवसाचे औचित्य साधुन कोर्टी,ता.पंढरपूर येथील पालवी परिवारास भेट देऊन तेथील सर्व कार्य पाहिले आणि तातडीने एक मोठी गॅस शेगडी फिटिंगसह, पाईपलाईन दुरुस्ती व हेअर कटिंग मशीन या करिता प्रकल्पास त्यांनी २१०००/- देणगी दिली.


      नवी मुंबई येथील यशस्वी उद्योजक सचिन सुरेश शहा यांनी पालवी प्रकल्प संस्थापक संचालिका मंगलताई शहा यांचेकडून मिळालेल्या माहितीतून बालकांनी संगणक साक्षर व्हावे या करिता अद्यावत संगणकाचे प्रत्येकी पस्तीस हजार रु.किमतीचे (HP ALL IN ONE) दोन संच भेट म्हणून दिले. 


   याप्रसंगी मंगलताई शहा,श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी,डॉ.अतुल दोशी, विनोदकुमार दोशी, अकलुज.डॉ.सुदेश दोशी, पंढरपूर,सचिन शहा,नवी मुंबई ,संदेश गांधी, भिमानगर,विजयकुमार शहा,टेंभुर्णी, मोहनलाल दोशी,फलटण आदी उपस्थित होते .
 
Top