जागतिक एड्स निर्मूलन दिनी एड्सग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर श्री सन्मती सेवा दलाच्यावतीने फुटली हास्याची "पालवी.."

जयवंत आवटे यांचा एकपात्री विनोदी व कथाकथनाचा कार्यक्रम

     पंढरपूर - मंगळवार दि.१ डिसेंबर रोजी जागतिक एड्स निर्मूलन दिनाच्या निमित्ताने श्री सन्मती सेवादल अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने पंढरपूर येथे प्रभा हीरा प्रतिष्ठान मार्फ़त चालविल्या जाणाऱ्या एड्सग्रस्त,अनाथ मुलांच्या संगोपनाचे कार्य करणाऱ्या पालवी संस्थेत कुंडल (सांगली) येथील जयवंत आवटे यांचा एकपात्री विनोदी व कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निनाद चंकेश्वरा होते. यावेळी व्यासपीठावर सन्मती सेवादल संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी,वीरेंद्र दोभाडा,पालवीच्या मार्गदर्शिका मंगलताई शहा आदि उपस्थित होते.समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली,पालवीच्या मुलांनी तुळशी रोप भेट देत मान्यवरांचे स्वागत केले.पालवीच्या मुलांनी यावेळी एक वचन नामा सादर केला.

आम्ही सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून एड्स निर्मूलन दिनानिमित्त पालवी संस्थेतील बाधितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा उपक्रम राबविला,तसेच पालवी संस्थेतील बालकांसाठी दलाच्या वतीने २८ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली - सन्मती सेवादल संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी
      लॉकडाउन काळापासून पालवी संस्थेतील मुलांच्या करमवणुकीचे सहल, स्नेहसम्मेलन आदि मनोरंजनाचे कार्यक्रम स्थगित झाले होते, त्यामुळे मुले कंटाळवाणी झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी श्री सन्मती सेवा दलाने एड्स निर्मूलन दिनाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पालवीच्या डिंपल घाडगे यांनी प्रास्ताविक केले त्यांनी पालवी संस्थेमार्फ़त चालविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली.

पालवीतील मुलांनी यावेळी आम्ही प्रकाशबीजे या अंतर्गत दोन देशभक्तिपर गीते सादर केली. या मुलांनी लॉकडाउन काळात टाकाऊ वस्तुंपासून बनविलेल्या बाहुल्या,मोबाइल पर्स,वॉल पीस आदि वस्तुंची माहिती दिली.

     यावेळी सन्मती सेवा दलाचे सदस्य नमन गांधी, महावीर शहा,नितेश फडे,पत्रकार सम्मेद शहा, रोहित चंकेश्वरा, अजिंक्य फडे,रत्नकुमार फडे, समय चंकेश्वरा,सुजल चंकेश्वरा, ईशान दोभाडा, सौ.दिपाली चंकेश्वरा, सौ.अल्पा दोभाडा आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका पठाण मँडम यांनी केले.डिंपलताई घाडगे यांनी आभार मानले.

हास्यकार जयवंत आवटे यांनी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवित त्यांना दिली व्यसनमुक्त, साक्षर होत, स्वतःच्या पायावर उभी होण्याची शिकवण. दलाच्यावतीने दिली २८ हजार रूपयांची आर्थिक मदत Comedian Jaywant Awate taught children to be free from addiction, literate and to stand on their own feet
 
Top