लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीतांनी नोंदणीचे आवाहन


पंढरपूर,२४/१२/२०२० - पंढरपूर शहरांमध्ये माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियान मोहीम राबविण्यात येत असून यावेळी माझे गाव,कोरोन मुक्त गाव शपथ घेण्यात आली.

पंढरपूर नगरपरिषदेमध्ये आरोग्य समिती सभा सभापती विवेक परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

      

 या सभेस मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व आरोग्य समिती सदस्य उपस्थित होते.या मिटिंग मध्ये आरोग्य विभागात करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच राबवण्यात येणाऱ्या अभियानाबाबत चर्चा करण्यात आली. 
भारतामध्ये -१)कोव्हिशील,२)कोव्हॉक्सीन, ३)झायकॉकD, ४)स्पुटनीकV, ५)NVX-COV2373  ६)प्रोटीन अँटिजनवर आधारित लस,७)HGCO-19, ८)भारत बायोटेकची लस ९)ऑरोव्हँक्सीन या ९ लसी क्यिनिकल ट्रायलमध्ये आहेत. 


     पुढील महिन्यात कोव्हीडसाठी लसीकरणाला सुरवात होणार असल्याने लसिकरणाच्या पहिल्या टप्यासाठी वैद्यकीय सेवा,आरोग्य विभागा संर्दभा तील नागरिक तसेच औषध विक्रेत्यांनी रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन करण्यात आले. काही माहीती हवी असल्यास,अधिक माहितीसाठी आरोग्य विभाग किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांचेशी संपर्क करावा असे आवाहन केले.पंढरपुरातील अधिकारी,कर्मचारी या संर्दभातील प्रशिक्षण घेत असल्याचे आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले.पुढील काही महिन्यामध्ये विविध टप्यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना लस देण्यात येईल असे सांगितले. नागरिकांनी सहकार्य करावे व शासनाकडून दिलेल्या सुचनेवर व माहितीवरच विश्वास ठेवावा असे सांगितले.


     याप्रसंगी पंढरपूर शहर कोरोनामुक्त करण्या साठी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. पंढरपुरातील मध्यवर्ती,विविध ठिकाणी कोरोना चाचणीसाठी कँप राबवूयात असे सुचवले, जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील कोरोना संदर्भाती भिती दुर करुयात कारण जरी पॉझिटिव्ह आला तरी हजारो नागरिकांनी घरी राहूनच कोरोनावर मात केली आहे . व्यायाम, प्राणायाम,योगासन,मेडीटेशन,वॉकिंग,जॉगिंग व सायकलिंग या सर्व बाबी ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते , रोग प्रतिकारक शक्ती वाढते याबाबत विविध उपक्रम राबवण्याचे ठरले. सदर प्रसंगी माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियाना अंतर्गत शपत घेण्यात आली.


      साथीचे आजार ,डेंग्यू,मलेरिया,चिकनगुनीया या आजारासाठी चांगल्या प्रकारे यंत्रणा राबवत असल्याचे सभापती परदेशी यांनी सांगितले यापुढेही जनजागृतीवर जास्त भर देऊन नागरिक व प्रशासन मिळुन या संकटावर मात करु असे सर्व सदस्यांनी सुचवले व माझी वसुंधरा अभियाना राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

     आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे,नागनाथ तोडकर आणि अनिल अभंगराव यांनी आरोग्य विभाग व स्वच्छतेच्या मोहीमेचा आढावा दिला.

       हिवताप अधिकारी किरण मंजुळ यांनी साथीच्या आजाराबाबत राबवत असणाऱ्या मोहीमेचा आढावा दिला. 

  वैद्यकीय अधिकारी बजरंग धोत्रे यांनी लसीकरण व वैद्यकीय बाबींबिषयी माहीती दिली.

      या मिटिंगमध्ये आरोग्य समिती सदस्य नगरसेवक संजय निंबाळकर,नगरसेविका सर्वश्री शकुंतला नडगीरे,अर्चना रानगट,अनुसया शिरसट यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. बाळासाहेब कदम यांनी विषयांचे वाचन केले.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नागरिकांनी नोंदणी करण्याचे आवाहन citizens involved in health care are urged to register in first phase of vaccination
 
Top