कुर्डुवाडी शहरातील कोरोना काळात कार्य संकल्प नवरात्र मंडळकुर्डुवाडी,(राहुल धोका),१५/१२/२०२० - संकल्प नवरात्र बहुउद्देशीय महोत्सव मंडळ हे शहरातील आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील इतिहासातील एक परिपूर्ण मंडळ वारकरी सेवा,नवरात्र उत्सव, गणेश उत्सव व कोरोना विषयी विशेष कार्य या संस्थेने केले आहे. मंडळ २०११ साली स्थापन झालेले आहे.

कुर्डुवाडी शहरातून दर वर्षी ७० ते ८० हजार वारकरी पंढरपूरला जातात. या सर्वाची चहा,फळे, बिस्किटे,पिण्याचे पाणी,नाष्टा याची व्यवस्था पंढरपूर चौकात सलग पाच दिवस चालू असते. पहाटे ५.०० पासून दुपारी ११.०० वाजेपर्यंत चौकातून जाणारे प्रत्येक वारकर्याची व्यवस्था हे मंडळ करत आले आहे.

  रक्तदान शिबिरे,उमिदसारख्या अनाथ संस्थेत खाऊ वाटप, प्रदुषण टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणुन सर्व उपक्रम फटाकेमुक्त असतात. ही संस्थेची खासियत आहे. 

   नवरात्रि उत्सवात नयनरम्य विद्युत रोशनायी संस्कर शिबिर,प्रबोधनपर जिवंत देखावे,बेटी बचाव बेटी - पढाव, पर्यावरण,वृक्षारोपण,संवर्धन विषयी जनजागृती फलक लावून प्रबोधन,जनता की अदालत,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात पौर्णिमेला आई - जगदंबा देवीचा छबिना व भव्य दिव्य मिरवणुकीचा कार्यक्रम परंपारिक पध्दतीने केला जातो. नवरात्र उत्सवात आरतीला उपस्थित महिलांसाठी कुपन पध्दतीने पैठणी देणारे मंडळ म्हणून ही प्रसिद्ध आहे .आरतीच्या वेळी प्रसाद स्वरुपात शाबुदाणावडे,केळी,राजगिरा लाडू असा अल्पोपहार दिला जातो. 

   गणेश उत्सवात सलग १० दिवस अन्नदानाची परंपरा आहे. सर्व प्रकारचा खर्च टाळून हा उपक्रम केला जातो. कोरोना -१९ या संसर्ग रोगासाठी  कार्य करताना ६५ कोरोनाग्रस्तांना धीर देवून सोलापूर येथील हास्पिटलमध्ये भरती करुन उपचारासाठी ट्रस्टी प्रणेश बागल यानी सहकार्य केले आहे व करत आहेत मंडळाचे संस्कृतिक कार्यक्रम प्रमुख व मार्गदर्शक प्रा.मोहन खरात संस्थापक अध्यक्ष नारायण बागल, आधार स्तंभ हरिदास बागल,उत्तरेश्वर बागल,विलास बागल, गणेश बागल,बाळासाहेब यळवे,बाळु गायकवाड़, मुकेश जाधव,निखिल पापरीकर,विकी भलाणी, सुजित बागल,महम्मद पाझणीकर,रमेश वाघ, नामदेव बागल आदि कार्यकर्ते परिश्रम घेत असतात.
 
Top